जाहिरात
गडचिरोलीताज्या घडामोडी

महा अनिसद्वारे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्कारावरील विज्ञान यावर मार्गदर्शन

Spread the love

गडचिरोली (दि,४ ऑक्टोंबर)

दिनांक ३ ऑक्टोबर ला दुपारी दोन वाजता गडचिरोली शहराजवळील कोटगल येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वतीने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्रीमती जुवारे मॅडम तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महा अंनिस चे जिल्हा कार्याध्यक्ष श्री विठ्ठलराव कोठारे व सहकार्यवाह श्री उपेंद्र रोहनकर उपस्थित होते.

लहान मुलांना घरातून व आजूबाजूच्या परीसरातून अंंधश्रद्धेला खतपाणी घालणारे बालकडू मिळत असतात. ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत, आणि ज्यांचा परिणाम मानवी शरीरावर देखील होत नाही अशा बाबी मुले लहान असताना त्यांना रंगवून सांगितले जाते व त्यातून लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जाते. पुढे मोठे झाल्यानंतरही त्यांना त्याच गोष्टी खऱ्या वाटू लागतात आणि त्यांच्या कडूनही तसेच पुढे पुढे सरकवण्याचे काम सुरू राहते. ही मुले वयात आल्यानंतर त्यांना आध्यात्मिकतेच्या नावाखाली भजन पुजन व किर्तन यात गुंतवून ठेवले जाते परीणामी मुले शिक्षणापासून वंचित राहतात. शिकले तरी ते कामापुरते मामा म्हणावे असेच त्याचे चित्र असते. लहान मुलांचे मेंदू हेच मुळी संस्कारक्षम असते. याच काळात त्यांना खऱ्या खोट्याची जाणिव झाली तर पुढे याच मुलांमध्ये संशोधन करण्याची उर्मी निर्माण होते. हिच बाब हेरून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती द्वारे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी व चमत्कारामागील विज्ञान समजावून सांगण्यासाठी शाळा शाळांमध्ये चमत्कारावर आधारित प्रात्यक्षिके करून दाखवली जाते.

महा अंनिस चे जिल्हा कार्याध्यक्ष श्री विठ्ठलराव कोठारे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय ते कसे आणि कोणत्या वेळी उपयोगात आणायचे असते यावर विस्तृत माहिती दिली. तर उपेंद्र रोहनकर यांनी चमत्कारामागील विज्ञान याचा उलगडा करून दाखविला. शिक्षक व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला चांगली साथ दिली. यावेळी शाळेतील शिक्षक श्रीमती मेश्राम मॅडम , रामटेके मॅडम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री कोसरे सर यांनी तर आभारप्रदर्शन श्री. पाकडे सर यांनी केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button