शेतकऱ्यांना कर्जमाफी व लाडक्या बहिणीला २१०० रुपये कधी देणार?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राज्य सरकारला सवाल

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.२९ जुलै)
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्ता येताच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार व सातबारा कोरा करणार असे प्रचार सभेत जाहीर आश्वासन दिले होते पण अद्यापही सरकार स्थापनेला ९ महिने होऊनही कर्जमाफी झाली नाही शिवाय लाडक्या बहिणींला २१०० रुपये कधी देणार असा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सरकार ला केला आहे. ते आज गडचिरोली येथे आले असता (दि. २९ जुलै) ला सर्किट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
विदर्भातील गोसीखुर्द धरणाच्या पाण्यामुळे पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी सुद्धा मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली.
महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणीसाठी, ओबीसी राजकीय आरक्षणासाठी, जातनिहाय जनगणनेसाठी – मंडल यात्रा
!!
९ ऑगस्ट पासुन मंडल यात्रा संपूर्ण महाराष्ट्र दौरा करणार असुन नागपूर येथून यात्रेची सुरुवात होणार आहे. त्या यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हिरवी झेंडी दाखवून मंडल यात्रेची सुरुवात होत असल्याची माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
आज झालेल्या पत्रकार परिषदेला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारवार, राजेंद्र शिंगणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, शहराअध्यक्ष विजय गोरडवार, अतुल वांदिले, माजी नगराध्यक्ष सुरेश पोरड्डीवार, सोनकुसरे, ठाकरे, सर्व सेल अध्यक्ष व कार्यकर्ते हजर होते.
