जाहिरात
आरोग्यगडचिरोली

२९ सप्टेंबर ला चातगाव येथील ‘सर्च’ रुग्णालयात ‘विशेष बाल मानसोपचार ओपीडी’

डॉ. भूषण शुक्ला (M.D.) बाल मानसोपचार विशेषज्ञ करणार तपासणी.

Spread the love

गडचिरोली (दि,२३ सप्टेंबर)

२९ सप्टेंबर २०२२ ( गुरुवार, स. ८ ते दु. १ पर्यंत) या दिवशी ‘सर्च’ मध्ये ‘विशेष बाल मानसोपचार ओपीडी’.

लहान मुलांमधील मानसिक कारणे उघडपणे दिसून येत नाहीत. परंतु ते खालील लक्षणांद्वारे ओळखली जाऊ शकतात. त्यात आक्रस्ताळेपणाने वागणे, लक्ष एकाग्र करता न येणे, एका जागी स्थिर न बसणे, बसल्यावर सतत हलत बसणे किंवा काहीतरी करत राहणे, अचानक स्वास रोखून धरणे किंवा निश्चल होणे, एक काम करत असताना ते सोडून दुसऱ्या कामाकडे लक्ष देणे, चिडचिडेपणा, हट्टीपणा, रागात वस्तू फेकून देणे, मोठ्या वयातही अंथरुणात लघवी करणे, घाबरलेले, निराश व चिंताग्रस्त असणे, एकांतात राहणे रडणे किंवा एकट्यानेच खेळणे, मृत्यू किंवा आत्महत्या बद्दल बोलणे, आपल्याच विश्वात आणि विचारात मग्न राहणे, शब्दाऐवजी मान हलवून उत्तरे देणे, समोरच्याने बोललेले तेच-तेच बोलणे, डोळ्यांची व हातांची विचित्र हालचाल करणे, झोपायला त्रास देणे, दचकून उठणे, भीती वाटत राहणे, स्वत:ला किंवा इतरांना विनाकारण दुखापत करणे, वर्तनात अचानक बदल दिसून येणे, नियमित कार्यात बदल झाल्यास अस्वस्थ होणे इत्यादि.लक्षणे दिसून येतात.
चतगाव येथे सर्च रुग्णालयात नियमित मानसोपचार OPD सुरूच असते. येथील रुग्णांचा वाढता प्रतिसाद बघता सर्च हॉस्पिटल ने या विषयातील विशेषज्ञांकडून सेवा पुरवण्यासाठी दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी विशेष मानसिक ओपीडी घेण्याचे ठरवले आहे.
ओपीडी साठी पेशंट नोंदणी ची वेळ सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत असेल.
तरी विशेष बाल मानसोपचार ओपीडीचा लाभ घेण्यासाठी तसेच गैरसोय होऊ नये म्हणून हॉस्पिटल मध्ये पूर्व नोंदणी करावी. असे आवाहन ‘सर्च‘ आणि मानसोपचारतज्ञ डॉ. आरती बंग यांच्या कडून करण्यात येत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button