जाहिरात
गंगाखेड

नगरपरिषदेच्या प्रमाणपत्रच्या फिस पुर्ववत करण्यासाठी मुख्याधिकारी यांना निवेदन,जनसेवक प्रमोद मस्के

Spread the love

गंगाखेड प्रतिनिधी (१४सप्टेंबर)

शहरातील नगरपरिषद प्रशासनाने पी टी आर, रहिवासी ,कामगार लेबर कार्ड, प्रमाणपत्र नळ कनेक्शन पावती, मीटर नाहरकत या सर्व कागदपत्रासाठी वाढीव केलेली फीस तत्काळ रद्द करून पूर्वीप्रमाणे फीस आकारण्या साठी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले
मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की गंगाखेड नगरपरिषद प्रशासनाने त्यांचे उत्पन्न वाढविण्या करिता शहरातील नागरिकांना पूर्वी पी टी आर साठी 50 रुपये फीस होती, आता पी टी आर साठी 200 रुपये फीस घेतली जात आहे, रहिवासी प्रमाणपत्र घेण्यासाठी पूर्वी 10 रुपये फीस घेतली जात होती ,आत्ता रहिवासी प्रमाणपत्र घेण्यासाठी 200 रुपये फीस घेतली जात आहे, लाईट साठी पूर्वी फीस 50 रुपये घेतली जात होती, आत्ता लाईट ना हरकत प्रमाणपत्र साठी 100 रुपये फीस घेतली जात आहे, नळ कनेक्शन घेण्यासाठी पूर्वी 200 रुपये फीस घेतली जात होती, आत्ता नळ कनेक्शन घेण्यासाठी फीस 500 रुपये घेतली जात आहे, आणि बांधकाम लेबर कार्ड प्रमाणपत्रासाठी पूर्वी मोफत प्रमाणपत्र देत होते, आता लेबर कार्ड प्रमाणपत्र घेण्यासाठी 100 रुपये फिस घेतले जात आहे, यापूर्वी नगरपरिषद मार्फत पी टी आर फीस फक्त जाहीर प्रगटन करण्यासाठी घेत होते, परंतु आता जाहीर प्रगटन चे पैसे भरून सुद्धा पी टी आर च्या कॉपीला 200 रुपये फीस वाढीव घेत आहेत, तसेच तसेच गोरगरीब नागरिकांना योजना घेण्यासाठी लेबर कार्ड प्रमाणपत्र मोफत दिले जात होते, कारण नगर पालिका प्रशासनाने उत्पन्न वाढवण्याकरता असे आदेश काढले आहेत परंतु 40% गोरगरीब नागरिकांना त्यामध्ये घरकुल साठी पी टी आर काढावा लागतो, व त्यांना ही योजना घेण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र व पी टी आर आणि सध्या बांधकाम कामगार लेबर कार्ड ही योजना गोरगरिबांसाठी सरकारने या गरीब नागरिकांना लाभ देण्यासाठी अमलात आणली आहे, ते लेबर कार्ड काढण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने आतापर्यंत लेबर कार्ड मोफत देत होते परंतु आता कामगार प्रमाणपत्र घेण्यासाठी 100रु फिस घेण्याचे सक्तीचे आदेश मुख्याधिकारी मॅडम यांनी काढले आहेत, या आदेशामुळे शहरातील गोरगरीब, दिन दलित , मजूर, नागरिकांचे खूप आर्थिक नुकसान होत आहे, त्यामुळे मेहरबान साहेबांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाढीव आदेश काढलेला तत्काळ रद्द करावा, अन्यथा जनशक्ती मित्र मंडळाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी.
यावेळी. निवेदनावर शेख ताजुद्दीन ज्ञानोबा पवळे शेख नजीर आयुब भाई पठाण शेख मगदूम भाई आदीच्या सह्या आहेत .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button