प्रतिनिधी- प्रवीण वाघे,(दि,१३ सप्टेंबर)
नेरी येथील नवरगाव मार्गावरील वार्ड क्र ४ मधून नेरी गावात जाणारा मुख्य रस्ता अजूनही जश्या चा तसा अजून नवीन बनण्याच्या प्रतीक्षेत आहे पाऊस आला की रस्ता चिखलाने माखून जाते यामुळे वार्डातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यासाठी अनेकदा निवेदन देण्यात आले. तसेच प्रहार संघटनेने आंदोलन सुद्धा केले परंतू ग्रा प हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचे प्रहार सेवक प्रवीण वाघे यांनी सांगितले आहे संपुर्ण गावातील रस्ते सिमेंट काँक्रेट झाले असून याच वार्डातील हा मुख्य मार्ग ग्रा प जाणून बुजून रोखून ठेवीत असल्याचा आरोप सुद्धा नागरिकांनी केला आहे सदर वार्डात ग्रा प सदस्यच नाहीत असे नागरिक बोलत आहेत त्यामुळे विकास खुंटला असल्याचे सांगण्यात येत आहे .
सविस्तर मागील तीन वर्षांपासून या मार्गाची मागणी असून प्रत्येक वेळेला ग्रा प ला निवेदन अर्ज करूनही ग्रा प दुर्लक्ष करीत असून याही वेळेला नवीन सदस्य ग्रा प निवडुन येऊन मोठे मोठे आश्वासन देऊन रस्ता बनवण्याची मागणी पूर्ण करू सर्व विकास करू असे बोब ठोकून सत्तेत बसले दीड वर्ष पूर्ण होऊनही अनेकदा अर्ज करून सुद्धा या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहेत तसेच ग्रा प ला विचारणा केली तर हो करू निधी आला की करू असे उडवाउडवीची उत्तरे देऊन समाधान केल्या जाते परंतु या मार्गावर संपूर्ण हेतुपुरस्सर दुर्लक्ष सुरू असून निधी उपलब्ध झाला की इतर मार्ग बनविल्या जाते पण या मार्गाची अनेक वर्षापासून मागणी असून सुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जाते असे नागरिक बोलत आहेत हा मार्ग गावात जाण्यासाठी सरळ व जवळ असल्याने पाऊस पडला की संपुर्ण चिखलमय होऊन पाणी साचल्याने रहदारी करणे कठीण होते नागरिकांना जाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो तेव्हा संबंधित विभागाने याची दखल घेऊन तात्काळ मार्ग बनवून द्यावा. यापुढे वार्ड मेंबर ला वाचा फुटते की काय याकडे वार्डातील नागरीकांच लक्ष लागल आहे.