इतर चार मंडळाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची रामप्रभू मुंडे यांची मागणी
अन्यथा 17 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण
गंगाखेड प्रतिनिधी (दि,१२ सप्टेंबर)
शेतकऱ्यांना आसमानी, सुलतानी संकटाला वारंवार सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजावा असे संकट शेतकऱ्याची पाठ काही सोडण्यास तयार नाही. त्यात काही प्रशासनातील कर्मचारी यांच्या काम चुकापणामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही.
शेतकरी राजा संकटातून बाहेर पडण्यासाठी फक्त दोनच जनाकडे विनंती करतो एक देव दुसरे प्रशासन काहीतरी मिळेल हा उद्देश ठेवून असतात.

गंगाखेड तालुक्यातील पाच कृषी मंडळे असताना एकच मंडळाला शासनाच्या वतीने 25 टक्के पिक विम्याची आग्रीम रक्कम देण्याचे घोषित केले आहे. पण गंगाखेड, महातपुरी, राणीसावरगाव, पिंपळदरी या चारही मंडळाचे आदेश असतानाही पंचनामे केले नाही. पंचनामे करून या मंडळातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळावा यासाठी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी दि.12 सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंडे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
पिंपळदरी मंडळाचा पंचनामा नाही झाल्यास 17 सप्टेंबर रोजी मराठामुक्ती संग्राम दिनी गंगाखेड तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.