जाहिरात
गडचिरोली पोलीसताज्या घडामोडी

३६ लाख इनामी ४ पुरुष नक्षली ठार करण्यात पोलिसांना आले यश

एस पी ची पत्रकार परिषदेतून माहिती

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली(दि,१९ मार्च)

आगामी लोकसभा निवडणूक २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठा घातपात करण्याच्या उद्देशाने तेलंगाणा राज्यातून आलेल्या चार नक्षल्यांना सी ६० जवानांनी गोळीबार करून अखेर ठार केल्याची घटना अहेरी तालुक्यातील उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उपपोस्टे रेपनपल्ली पासून दक्षिण-पूर्व ०५ कि.मी अंतरावर असलेल्या कोलामर्का पहाडी जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबवित असतांना दि. १९ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या माओवादयांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला.त्यावेळी पोलीसांनी माओवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले असता, माओवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वरंक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर ४ पुरुष माओवादी मृत अवस्थेत आढळले. मृतक नक्षलयांची नावे अनुक्रमे, १) डीव्हीसीएम व्हर्गिस, वय २८ वर्षे, जि. बीजापूर (छ.ग.) सचिव, मंगी इंद्रावेली क्षेत्र समिती तथा सदस्य, कुमरामभिम मंचेरीयल विभागीय समिती २) डीव्हीसीएम पोडीयम पांडु ऊर्फ मंगुलू, वय ३२ वर्षे, रा. कोटराम, भैरमगड जि. बीजापूर (छ.ग.) सचिव, सिरपूर चेन्नूर क्षेत्र समिती ३) के. राजू, प्लाटून सदस्य ४) के व्यंकटेश, प्लाटुन सदस्य अशी नावे आहेत.

महाराष्ट्र शासनाने एकुण ३६ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते.

 

घटनास्थळावरून हस्तगत केलेले साहित्य
¶¶¶
घटनास्थळावरुन १ नग एके ४७ रायफल, १ नग कार्बाइन रायफल, २ नग देशी बनावटी पिस्तुल, जिवंत काडतुस व इतर स्फोटक साहीत्यासह मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे.

सदर अभियान विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ जगदीश मीणा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल,अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख,अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) एम. रमेश व पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून, सी-६० कमांडोच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतुक केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button