नक्षल्यांनी केली पोलीस पाटलाची हत्या

लोकशाही न्युज, एटापल्ली(दि,२५नोव्हेंबर)
सुरजागड लोहखानीला समर्थन करीत असल्याचा ठपका ठेवून नक्षल्यानी गुरुवारी रात्री एटापल्ली तालुक्यातील टीठोडा या गावी पोलीस पाटील लालसु वेळदा ( वय ६० वर्षे) यांची गोळ्या घालून हत्या केली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.
मृतक लालसु वेडदा याचा मुलगा अहेरी येथील प्राणहिता पोलीस उप मुख्यालयातील नक्षलविरोधी अभियानाच्या सी ६० पथकात कार्यरत आहे.
घटनास्थळी नक्षल्यानी एक पत्र टाकले आहे सुरजागड लोहखाणी मुळे नैसर्गिक साधन संपत्तीची लूट होत असून काही गावातील पोलीस पाटील, गाव पाटील, भूमाफिया ही मंडळी सुरजागड लोहखाणीचे समर्थन करीत आहे शिवाय ते आपल्या मुलांना तेथे नोकरीला लावत आहेत लालसु वेळदा त्यापैकीच एक होते म्हणून त्याची हत्या केल्याचे नक्षल यांनी पत्रकात नमूद केले आहे.
नोव्हेंबर महिन्यात नक्षलयांकडून दोन हत्या झालेल्या आहेत, या अशा हत्याने नक्षलवादी पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र दिसते.
