जाहिरात
गडचिरोली पोलीस

छत्तीसगडचा जहाल नक्षली गडचिरोली पोलीसांच्या ताब्यात

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली/अहेरी(दि,२४ फेब्रुवारी)

फेब्रुवारी ते मे दरम्यान नक्षलवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, पोलीस दलावर हल्ले करून त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारचे सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात.

(व्हिडिओमध्ये गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात छत्तीसगढी नक्षली).

२३ फेब्रुवारी २०२३ रोजी मिळालेल्या गोपनिय खबरीच्या आधारे दामरंचा जंगल परिसरात विशेष अभियान पथकाच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवून जहाल नक्षली नामे वेल्ला कैसे वेलादी, वय ३५ वर्षे, रा. येडापल्ली तह. भोपालपट्टनम्, जि. बीजापूर, (छत्तीसगड) यास अटक केली.

विविध गुन्ह्यात होता सहभागी
¶¶¶¶
अटक करण्यात आलेला नक्षली सन २००१ पासून जनमिलीशीया म्हणुन नक्षलचे काम करत होता. त्यानंतर सन २००६ पासून दिलीप आणि मंगी (सैंड्रा) दलममध्ये सदस्य या पदावर कार्यरत होता. त्याचा सप्टेंबर २०२१ साली मौजा मडवेली जंगल परिसरात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीमध्ये सहभाग होता. तसेच त्याचा दिनांक २३/१२/२०२२ रोजी मौजा टेकामेटा जंगल परिसरात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत सहभाग असून या चकमकी दरम्यान त्याने छत्तीसगड दलमचा डीव्हीसीएम भास्कर यास पळून जाण्यास मदत केली होती अशी माहीती चौकशी वरुन मिळाली.
जाळपोळ, चकमक, दरोडा, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे इत्यादी गुन्ह्यामध्ये सहभाग असून, त्यास २०२१ साली मौजा मडवेली जंगल परिसरात झालेल्या चकमक या गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.

सदर नक्षलीला मा. न्यायालयापुढे हजर केले असता, दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे, व पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button