गडचिरोली (दि,२२ऑगष्ट)
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गडचिरोलीचे वतीने दिनांक २० ऑगस्ट रोज शनिवारला शहिद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ सकाळी ५.३० वाजता इंदिरा गांधी चौकातून लांझेडा मार्गे इंदिरा नगर पर्यंत विविध घोषवाक्य व परिवर्तनाच्या चळवळीतील स्फूर्तीदायक गीतांचे गायन करीत निर्भय मार्निंग वाॅकचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत सुमारे ३० पेक्षा अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सेवा निवृत्त प्राचार्य तथा महा अंनिस चे सल्लागार, राज्य सरकार पुरस्कृत आदर्श शिक्षक मा. श्री देवाजी सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली रॅलीचे सभेत रूपांतर करण्यात आले. झालेल्या सभेत डॉ नरेंद्र दाभोळकरांच्या कार्यावर समीतीतील अनेक जिल्हा तथा शहर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पृथ्वीवरील लाख मोलाचा माणूस अशा शब्दांत
काढून सनातन्यांनी त्यांनाच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात पाडून त्यांच्या विचारांना संपविण्यासाठी ज्या अमानवीय कृत्याचा परीचय दिला त्या मारेकरी तथा त्यांच्या मागे असलेल्या मास्टर माईंडचा निषेध केला आणि न्याय व्यवस्थेने या कुकर्म करणाऱ्यांवर लवकरात लवकर कार्यवाही करुन त्यांना फाशीची शिक्षा द्यावी असे आवाहन केले. तसेच त्यांनी देश हितार्थ दिलेल्या बलीदानाबद्दल ते अनेक शतके अजरामर राहतील असे अनेकांनी मत व्यक्त केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना श्री सोनटक्के सर म्हणाले की, जर एखाद्या व्यक्तीचे विचार हे माणूस घडविणारे असतील, त्यांचे कार्य समाजातील गोरगरीबांच्या हितासाठीच असतील तर अशा अमानवीय कृत्य करणाऱ्यांनी असे कितीही प्रयत्न केले तरी ते यशस्वी होतीलच असे नाही. त्यासाठी त्यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणारे हाडामासाचे कार्यकर्ते निपजले पाहिजे आणि ते कार्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यासह गडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागात डॉक्टरांना जाऊन आज नऊ वर्ष झाली तरी पण त्यांची उणीव भासू न देता अव्ययातपणे सुरु आहे. तेव्हा सनातन्यांच्या थोबाडीत मारलेली ही एक चपराकच आहे असे मार्मिक मार्गदर्शन केले.
यावेळी महा अंनिसचे राज्य सहकार्यवाह विलास निंबोरकर, जिल्हा कार्याध्यक्ष विठ्ठल कोठारे, जिल्हा प्रधान सचिव विलास पारखी, प्रशिक्षण विभाग कार्यवाह पुरुषोत्तम चौधरी, सांस्कृतिक अभिव्यक्ती कार्यवाह पुरुषोत्तम ठाकरे, निधी विभाग कार्यवाह गोविंदराव ब्राह्मणवाडे, शहर उपाध्यक्ष लहुजी रामटेके, शहर विविध उपक्रम प्रमुख वामनराव भोयर, शहर कार्याध्यक्ष दामोदर उप्परवार, शहर सांस्कृतिक विभाग कार्यवाह उपेंद्र रोहनकर, जिल्हा उपाध्यक्ष कमलाकर वारके, शहर अध्यक्ष शब्बीर शेख, कविवर्य वसंत कुलसंगे, नवेगाव शाखेचे उपाध्यक्ष हरिदास कोटरंगे, जिल्हा विविध उपक्रम प्रमुख उद्धव बांगरे, जिल्हा बुवाबाजी संघर्ष प्रमुख श्री प्रशांत नैताम, सदस्य श्री दिपक आंबुलकर, प्रभाकर भागडकर, राजू नंदावर, बी एम चापले, रामभाऊ धकाते, रमेश मोरघरे, दत्तात्रेय पाचभाई, मोहनदास मेश्राम, बी एम राजनहिरे, झाडीबोली साहित्य मंडळाचे उपाध्यक्ष विनायक धानोरकर, प्रमोद टोपरे, गणेश त्रिमुखे, भास्कर कोठारे, विलास बलमवार, सुधाकर दुधबावरे, श्री बोरकुटे, श्री गिरसावडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
