आजादीच्या अमृत महोत्सव निमित्य हरघर तिरंगा अभियान
चिखली प्रतिनिधी :: लक्ष्मी गिरहे (दि,६ ऑगष्ट)
६ ऑगस्ट २०२२ रोजी आजादीच्या अमृत महोत्सव निमित्त संपूर्ण देशभरात हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे. आपल्या चिखली तालुक्यातील एकलारा गावा मधे हा अभियान मोठ्या प्रमाणात राबवायचा आहे.
हर घर तिरंगा अभियानाचे संयोजक ग्रामपंचायत चे सचिव रामभाउ रिंडे यांनी नियोजनासंदर्भात बैठक घेतली. बैठकीमध्ये घर घर गाव गावा पर्यंत तिरंगा अभियान जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला कसा राबवता येईल या सर्व विषयांवर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात नियोजन करण्यात आले.
या बैठकीमध्ये ग्रामपंचायत सरपंच सर्व सदस्य व गावातील मंडळी पंचायत समिती माजी सभापती तथा सदस्य लक्ष्मणराव अंभोरे ,गजानन अंभोरे, बंडु अंभोरे ,विजू लंके ,बद्री अंभोरे ,बंडू कदम, गणेश वालेकर, तुकाराम अंभोरे ,पदाधिकारी उपस्थित होते.! तसेच विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक, व सर्व शिक्षक , जिल्हा परिषद शाळेचे प्रध्यापक, उर्दू शाळेच्या प्राध्यापक, अंगणवाडी सेविका ,गावातून फेरी काढण्यात आली.
