जाहिरात
गडचिरोलीराजकीय

वाघाच्या हल्ल्यातील मृतकाच्या परिवाराला २५ लक्ष रुपयाची आर्थिक मदत करा,आमदार डॉक्टर देवरावजी होळी

Spread the love

गडचिरोली (दि,१ ऑगष्ट)

निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची केली मागणी!

धुंडेशिवणी येथील वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पावलेल्या मृतकाच्या परिवाराला भेट दिली व आर्थिक मदत करून केले सांत्वन !

मागील तीन दिवसात गडचिरोली तालुक्यातील २ निष्पाप लोकांचा नरभक्षक वाघाने बळी घेतला असून वाघाला माणसाची चटक लागल्याने आणखी निष्पाप लोकांचा जीव जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा व मृतकाच्या परिवाराला २५लक्ष रुपया ऐवजी २५ लक्ष रुपयापर्यंतची मदत देण्यात यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे कडे पत्राद्वारे केली आहे.

धुंडेशिवणी येथील वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पावलेल्या मृतकाच्या परिवाराला आमदार डॉ देवराव जी होळी यांनी भेट दिली व आर्थिक मदत करून त्यांचे सांत्वन केले.

गडचिरोली तालुक्यामध्ये वाघाने थैमान माजवले असून संपूर्ण तालुक्यात वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. दिनांक २७ जुलै रोजी जेप्रा येथील नीलकंठ मोहुर्ले व दिनांक २८ जुलै रोजी धुंडेशिवणी खुशाल तुकाराम निकूरे यांचा बळी वाघाने घेतला. परिवारातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले आहे. या वाघाचा तातडीने बंदोबस्त न झाल्यास आणखी निष्पाप लोकांचा बळी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. त्यामूळे या वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आमदार महोदयांनी केली आहे.
तसेच वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या मृतकाच्या परिवाराला शासनाकडून १५ लक्ष रुपये देण्यात येते. ही रक्कम कमी असून त्यात वाढ करून किमान २५ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात यावी. अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button