जाहिरात
ताज्या घडामोडी

गडचिरोली : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ नामनिर्देशनासाठी ऑफलाइनचीही मुभा

रविवारीही फॉर्म स्वीकारले जाणार

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.१५ नोव्हेंबर)

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस दोन दिवस शिल्लक असून, इच्छुक उमेदवारांसाठी यंदा ऑनलाइनसोबतच ऑफलाइन पद्धतीनेही नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची महत्त्वाची सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे, रविवार (दि. १६) या सुट्टीच्या दिवशीही सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये उमेदवारांचा सहभाग अधिक सुलभ व्हावा आणि तांत्रिक अडचणी येणाऱ्या इच्छुकांना न्याय मिळावा, याकरिता राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाइन प्रक्रियेसोबत पारंपरिक ऑफलाइन मार्गही खुला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

– नामनिर्देशनपत्रे १६ नोव्हेंबर या दिवशी (सुट्टी असूनही) स्वीकारली जातील.
– फॉर्म स्वीकारण्याची वेळ : सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत
– नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत : १७ नोव्हेंबर २०२५, दुपारी ३ वाजेपर्यंत
– उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे आणि शुल्कासह पूर्ण फॉर्म निश्चित कालमर्यादेत सादर करावेत.

गडचिरोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ संदर्भात सर्व इच्छुक उमेदवार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरिक यांना सूचित करण्यात येते की, या निवडणुकीकरिता ऑनलाइनसोबतच ऑफलाइन पद्धतीनेही नामनिर्देशनपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत दि. १७ नोव्हेंबर २०२५ दुपारी ३.०० वाजेपर्यंत आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून, वेळेत आणि नियमानुसार नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नगरपरिषद मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button