१ ऑगष्टला विशाल कावड यात्रेचे आयोजन
लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,२० जुलै)
सुंदरकांड मंडळ व मित्रपरिवार तर्फे आयोजित, हिंदू धर्मानुसार पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण मासाला सुरुवात झाली आहे या श्रावणमास मध्ये मोठ्या प्रमाणात भगवान शंकराची पूजा केली जाते.त्यातच कावड यात्रा काढण्याची मोठी परंपरा आहे संपूर्ण भारतात सद्यस्थितीत कावड यात्रेचे आयोजन केले जात आहे त्याच पार्श्वभूमीवर गडचिरोली येथे येत्या १ ऑगष्टला विशाल कावड यात्रेचे आयोजन सुंदरकांड मंडळ तथा मित्र परिवारातर्फे करण्यात आलेले आहे.
कावड यात्रा ही १ ऑगष्टला दुपारी दोन वाजता स्थानिक जुनी नगरपरिषद येथील दुर्गा माता मंदिर पासून पायदळ विदर्भाची काशी मार्कंडा येथे जाणार आहे.
कावड यात्रेत मोठ्या संख्येने गडचिरोली तील शिवभक्त सहभागी होत असतात कावड यात्रेचे स्वरूप याप्रमाणे आहे की समोर लाऊड स्पीकर मध्ये शंकर भगवान चे भजन वाजवत खांद्यावर कावड घेऊन शिवभक्त पायदळ मार्कंडा येथे जाणार आहेत तसेच कावड मध्ये नेलेल्या जलाने मार्कंडेश्वर यांचे अभिषेक करणार आहेत सदर कावड यात्रेत मंडळातर्फे मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात सामान्य नागरिकांना सदर कावडयात्रेसाठी कोणताही त्रास होऊ नये अथवा वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरिता मंडळातर्फे विशेष आयोजन करण्यात येते. मंडळातर्फे मोठ्या उत्साहात व शिस्तीत कावड यात्रा दरवर्षी काढण्यात येते. कावड यात्रेचे हे पाचवे वर्ष आहे.
कावडयात्रेत जास्तीत जास्त संख्येने गडचिरोलीकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन सुंदरकांड भजन मंडळ व मित्रपरिवार तर्फे करण्यात आलेले आहे .
