
लोकशाही न्युज, चामोर्शी (दि.३ मार्च)
चामोर्शी तालुका मुख्यालयापासून अवघ्या ३ किमी अंतरावर असलेल्या जि.प. उच्च प्राथमिक शाळा जयनगर येथे जितेंद्र जिवन मंडल हे मुख्यध्यापक पदावर असुन कोमल ओमप्रकाश साखरे हया विज्ञान शिक्षीका पदावर कार्यरत आहेत. दोघांनीही संगनमताने आप-आपले वर्ग अगदी जवळ जवळ इमारतीत आणून तिथेच एका छोटया खोलीत मुख्याध्यापक कार्यालय देखील आणले आहे.
मागील सत्रात शाळा सकाळ पाळीची सुरु झाल्या पासुन जितेंद्र जिवन मंडल व कोमल ओमप्रकाश साखरे हे शाळा सुटटी झाल्यावर देखील दोघेच दोन दोन तास कार्यालयातच बसून राहत होते. उन्हाळी सुटटीत सुध्दा हेच दोघे काही ना काही काम दाखवून तासन तास शाळेत कुणीही नसताना कार्यालयात बंद राहायचे.
या शैक्षणिक सत्रात तर या दोघांची खुप हिम्मत वाढली. कार्यालयातच एकमेकांना मिठी मारणे, जेवनाचा घास भरवणे, अनेक वेळ पर्यंत एकमेकांना चिपकून राहणे, सोबतच अत्यंत गंभीर व घृणास्पद प्रकार शाळेच्या वेळेतच करु लागले. हे सर्व प्रकार अनेक विदयार्थ्यांनी प्रत्यक्ष स्वतःच्या डोळयांनी बघीतला आहे.
विदयार्थी का बर कार्यालयात डोकावून बघतात व आमचे कृत्य बघतात या साठी शाळेतील अनेक विदयार्थ्यांनी यासाठी खूप मार खाला आहे. या दोघांनी आम्ही कार्यालयात असताना कोणताच विदयार्थी वर्गाबाहेर अजिबात येणार नाही असा सज्जड दम देखील वारंवार विदयार्थ्यांना देत होते.
शाळेत असे अश्लिल वर्तन करणाऱ्या जितेंद्र जिवन मंडल व कोमल ओमप्रकाश साखरे यांचेवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संवर्ग विकास अधिकारी,
पंचायत समिती, चामोर्शी यांना दिलेल्या तक्रारीतुन जयनगर शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे.सदर तक्रार २८ जानेवारी २०२५ ला केली आहे. शाळेत गैरवर्तन करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षीकांवर का कारवाई करतात याकडे जयनगरवासीयांचे लक्ष लागले आहे.
चौकशी समिती नेमली,पुढे काय?
¶¶¶
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जयनगर चामोर्शी यांच्या तक्रारीनुसार संवर्ग विकास अधिकारी पंचायत समितीने १२ फेब्रुवारी २०२५ ला समिती नेमली व ३ दिवसात अहवाल सादर करा असे सांगितले. १)यशवंत रामजी टेंभुर्ण गटशिक्षणाधिकारी, पं.स.चामोशी, २) माधुरी प्रकाश पोतराजे केंद्रप्रमुख केंद्र-येणापुर पं.स.चामोशी,३) चित्ररेखा जलेद खोब्रागडे केंद्रप्रमुख केंद्र-सोधी पं. स. चामोशी, ४) माणिक भगवान यत्पडे केंद्रप्रमुख केंद्र-चामोर्शी पं.स. चामोशी, ५)सुनंदा एम. बार पद. प्राथ शिक्षिका तथा प्र.मुख्याध्यापक जि.प.शाळा बहादुरपुर पं.स. चामोर्शी यांची चौकशीसाठी निवड केली आहे.
पण सदर समितीकडून अजूनही चौकशी अहवाल सादर न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
