जाहिरात
आपला जिल्हाताज्या घडामोडी

गडचिरोली: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार तरी कधी

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,६ सप्टेंबर)

गडचिरोली येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा होऊन २ वर्ष उलटली.आता विधानसभेची निवडणूक होऊ घातल्याने पुढील महिन्यापासून आचारसंहिता लागणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी जवळपास ४० ते ५० एकर जागा ही अधिक ग्रहण करण्यात सरकारला यश आले आहे. त्यात काही महसूल ची तर काही वनविभागाची जागा आहे.

त्यामुळे गडचिरोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असे गडचिरोलीकरांना वाटत होते पण अजूनही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे केवळ जुन्या ठिकाणी नवीन गेट उभारून व रंगरंगोटी झाल्याने इतर कुठलेही कामाला सुरुवात केलेली नाही असे वास्तविक चित्र आहे.

गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काही त्रुटी तर नाही ना असा प्रश्न गडचिरोलीकरांना पडलेला आहे.त्यामुळेच कदाचित गडचिरोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्यास अडचण तर नाही ना असं दिसून येत आहे.

गडचिरोलीत वैद्यकीय महाविद्यालय होण्याच्या घोषणेला आता जवळपास २ वर्ष पूर्ण झालेले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न साकार होईल असे वाटत नाही. राज्यकर्त्यांनी दाखविलेले गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे केवळ एक दिवा स्वप्नच आहे की काय असे वाटू लागले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button