गडचिरोली : प्रभाग क्र. ५ अ अनु जाती महिला प्रवर्ग सिमा राहुल कन्नमवार (कोसे) यांच्या उमेदवारीची चर्चा

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २७ नोव्हेंबर)
२ नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. यात गडचिरोली नगर परीषदेच्या माध्यमातून गडचिरोली शहराच्या विकासात योगदान देण्यासाठी प्रभाग क्र. ५ अ चे नेतृत्व करण्यासाठी सिमा राहुल कन्नमवार (कोसे) सज्ज झाल्या आहेत. त्या प्रभागातील घरोघरी भेटी घेत आहेत.
आजपर्यंत विविध सामाजिक कार्यात सक्रीय असलेल्या सिमा राहुल कन्नमवार (कोसे)आता शहर विकासासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यांच्या योग्यता व नेतृत्व क्षमता बघून भारतीय जनता पक्षाने त्यांना प्रभाग क्र. ५ अ मधुन उमेदवारी दिली आहे.
गडचिरोली नगर परीषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अॅड. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर)यांच्या नेतृत्वात नगरसेविका म्हणून जनतेची सेवा करण्यासाठी सिमा राहुल कन्नमवार (कोसे) जनतेशी संवाद साधत असून जनताही त्यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना यशासाठी शुभेच्छा देत आहेत.
सिमा राहुल कन्नमवार (कोसे) संपूर्ण प्रभाग फिरत असून प्रत्येक घरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. जनतेचा आशीर्वाद मिळून अपेक्षित यश मिळाले की आपण या सर्व समस्या सोडवून जनतेला सर्व सुख, सुविधा पोहोचवण्यासाठी यशस्वी प्रयत्न करू. जनतेच्या आशीर्वादाने जनतेच्या सेवेसाठीच आपण निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे त्यांनी सांगितले.
