जाहिरात
चिमुरनेरी

घर एकीकडे, रस्ता बांधकाम दुसरीकडे,चक्क नागरीकांची दिशाभुल करणारा नेरी ग्रा. प. चा प्रताप ,

अनुसूचित जाती व नवबौद्ध विकास योजनेचा दुरुपयोग नागरिकांचा आरोप,

Spread the love

प्रतिनिधी-प्रवीन वाघे,(दि,१९ सप्टेंबर)

चिमूर तालुक्यातील नेरी हे लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे गाव असून तालुक्यातील सर्वात मोठी ग्रा प असून विविध समस्यांनी ग्रासलेले असल्याचे पहावायस मिळत आहे.
नेरी येथील टिळक वार्ड क्र.1 पेठ विभाग येथे नुकताच सिमेंट काँक्रिटच्या रोडचे बांधकाम करण्यात आले मात्र हे बांधकाम चुकीच्या पद्धतीने मंजूर करून अनुसूचित जाती व नवबौद्ध विकास योजनेच्या निधीचा दुरुपयोग करण्यात आलेला आहे तसेही ग्रा. प. चे पदाधिकारी हे मनमर्जी पणे काम करतात असा आरोप नागरिकांनी केलेला आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध विकास योजना अंतर्गत सुरुवातीला व शेवट अनुसूचित जाती च्या नागरिकांचे घर असणे आवश्यक आहे मात्र टिळक वार्डातील सिंमेंट कॉंक्रिट रोड बांधकाम करताना शासनाचे नियमांची पायमल्ली करण्यात आलेली आहे. रस्ता मंजुरीतील नंदू पाटील यांचे घरापासून मंजुरी देण्यात आली आहे मात्र प्रत्यक्षात सदर रोड वर नंदू पाटिल यांचे घरच अस्तित्वात नाही तर त्यांचे आई चे नावाने असलेले घर हे दुसरीकडे असताना नंदू पाटील यांचे घर दाखवून अनुसूचित जाती व नवबौद्ध विकास योजनेच्या निधीचा वापर करून दुरुपयोग करण्यात आलेला आहे.असा नागरिकांचा दिशाभुल करणारा प्रताप ग्रामपंचायत नी केला आहे असा आरोप जनतेनी केला आहे.


त्यातच सदर रस्ता बांधकाम करताना नियमांची पायमल्ली करण्यात आलेली आहे. रस्त्या खोदकाम न करता न त्याचे खळीकरण न करता थातूरमातूर फक्त सिमेंट कॉंक्रिट चा थर हातरण्यात आला त्यातही रस्त्याची उंची ही अत्यंत कमी करून दर्जाहीन काम करून फक्त नफेखोरी युक्त काम करण्यात आलेले आहे.सदर ग्रा. प. ही नेहमीच या न त्या विषयांनी नेहमीच चर्चेत असून अनेक समस्यांनी ग्रस्त आहे, त्यामुळे टिळक वार्डातील नंदू पाटील ते सुशीला डांगे यांचे घरासमोरील नावाने मंजूर केलेल्या रस्त्याची चौकशी करून अनुसूचित जाती व नवबौद्ध विकास योजनेचा दुरुपयोग करणाऱ्या दोषीवर तात्काळ कारवाही करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button