जाहिरात
गडचिरोलीब्रेकिंग न्युज

गडचिरोली शहरात रामनगर वार्डात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ

Spread the love

गडचिरोली (दि,२८जुले)
गडचिरोली शहर ते पोटेगाव बायपास मार्गावरील जीलानी बाबा दर्गाच्या बाजुला हजारे आटाचक्की कडे जाणाऱ्या रस्त्यालगत नालीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने गडचिरोली शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मृतक व्यक्तीचे अंदाजे वय ३० ते ३५ असावे.
सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा करण्यात आला. मृत व्यक्तीची ओळख अद्याप झालेली नाही मृतकाच्या शरीरावर व कपाळावर धारधार शस्त्राने मार आहे तसेच कमरेला व मागच्या बाजुने मार आहे. सदर व्यक्तीची हत्या करून मृतदेह हा मारेकऱ्यांनी रात्रीच्या सुमारास नालीत टाकल्याची चर्चा आहे .
सदर मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून सदर मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे उत्तरीय तपासणीकरिता व शवविच्छेदना करिता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे मृतदेह हलविण्यात आले .

अशा  घटनेने गडचिरोली शहरात भीतीचे पण वातावरण तयार झाले आहे .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button