चिमुरब्रेकिंग न्युज
ब्रेकिंग- ट्रॅक्टर उलटुन १ महिला ठार तर ५० विद्यार्थी जखमी,गणपती विसर्जन बेतल जीवावर
चिमुर तालुक्यातील काजळसर येथील प्रकार
प्रतिनिधी-प्रवीन वाघे,(दि,२४ सप्टेंबर)
चिमूर जवळील नेरी पासून १५ किमी अंतरावरील काजळसर येथे गणपती विसर्जन करून ट्रॅक्टरने जात असतांना ट्रॅक्टर भर वेगात पलटल्याने १ महिला जागेवर ठार तर २५ ते ३० विद्यार्थी गंभीर जखमी त्यात १५ ते २० महिला सुद्धा गंभीर जखमी झाल्या आहेत.
(छायाचित्रात अपघातात ठार झालेली महिला)
यांच्यावर उप जिल्हा रुग्णालय चिमुर येथे प्रथमोपचार सुरु असून काहींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. याबाबत घटनेची माहीती मिळताच चिमुर शहरातील खासगी डॉक्टर सुद्धा तात्काळ मदतीसाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल झाले.चिमुर पोलीस पुढील तपास करीत आहे.

जाहिरात
