“आप ” तर्फे प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

गडचिरोली (दि,९ मे)
राज्य माध्यमिक आणि उच्य माध्यमिक मंडळाच्या वतीने व राज्य शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार जाहीर केलेल्या निकालात यंदा कोरोना नंतर प्रथमच स्थानिक शालेय केंद्रावर ऑफलाईन पध्दतीने पार पडलेल्या राज्य उच्य माध्यमिक परिक्षेत स्थानिक गडचिरोली येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणारा मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी शाम सुधीर झंझाळ या विद्यार्थ्यांने ९६.६७ टक्के गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे या यशाचे श्रेय आई ,वडिल व गुरुजनांचे आहे असे तो सांगतो शामचे वडिल सुधीर झंझाळ हे आश्रम शाळा गिरोला येथे शिक्षक तर आई भूमिता गृहिणी आहेत आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने शाम सुधिर झंझाळ या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला शाल पुष्पगुच्छ व स्पर्धा परीक्षेचे पुस्तक देण्यात आले या सत्कार समारंभ प्रसंगी आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे,सचिव भास्कर इंगळे,शहर सघंटन मंत्री हितेंद्र गेडाम, एकनाथ गजबे,सावन सावसाकडे,सुधिर झंझाळ,भास्कर कोटांगले (आजोबा) इत्यादी उपस्थित होते.
श्यामला आयएएस व्हायचंय,,
गडचिरोली जिल्ह्यात सर्वप्रथम आलेल्या श्याम झंजाळ याला आधी डॉक्टर बनुन नंतर आयएएस ची तयारी करायची आहे.
यंदा गडचिरोली जिल्यात १२ चा निकाल ९६ टक्के लागला..
