देऊळगाव माळी येथील डॉ.पल्लवी गाभणे यांनी चंद्रपूर व गडचिरोली येथे उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार
लोकशाही न्युज पोर्टल..
चिखली | मेघा जाधव
मो.9529186383..
नुकत्याच जिल्हा नियोजन समिती गडचिरोली या सभागृहात वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचे जिल्हा तसेच माझ्या वतीने गौरव करण्यात आला.
जिल्हा प्रशासन चंद्रपूर व गडचिरोली तसेच मिशन रीसर्च आणि ॲक्शन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात विविध आरोग्य तपासणी शिबिर तसेच वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट सेवा प्रदान केल्याबद्दल देऊळगाव माळी तालुका मेहकर येथील ऑडिओलॉजीईस्ट डॉक्टर पल्लवी किशोर गाभणे यांचे खासदार सुप्रियाताई सुळे व मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व अशीच निरंतर सेवा पल्लवीच्या हातून घडो अशा सदिच्छा यावेळी त्यांनी दिल्या. यावेळी गडचिरोली, तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील दिग्गज मान्यवर मंडळी यांची उपस्थिती होती. पल्लवी गाभणे यांनी दिलेल्या मोफत निस्वार्थ व निरंतर सेवेबद्दल त्यांचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. मी यापुढे सुद्धा अशीच मानव सेवा करेल अशी ग्वाही यावेळी डॉक्टर पल्लवी यांनी उपस्थितांना दिली. मलाही प्रेरणा माझे काका डॉक्टर अनिल कुमार गाभणे तसेच माझ्या वडिलांकडून नेहमी मिळत असते अशा भावना त्यांनी माध्यमांची बोलताना व्यक्त केल्या.