जाहिरात
गडचिरोलीराजकीय

गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रद्द झाल्याची विरोधकांची माहिती चुकीची

पालकमंत्र्यांकडून दखल,किरण पांडव यांची माहिती

Spread the love

गडचिरोली (दि,३० मे)                                   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल येणार असल्याने रद्द झाले हा विरोधकांचा कांगावा चुकीचा आहे. सदर महाविद्यालयाचा प्रस्ताव प्रक्रियेमध्ये असून पालकमंत्र्यांकडून दखल घेतली जात असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा समन्वयक किरण पांडव यांनी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या सुविधा व बेड संख्या पूर्णपणे करण्यासाठी नुकताच पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून शासकीय महिला व बाल रुग्णालयात १०० बेडच्या वाढीव बांधकामाला मंजुरी दिली असून त्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या काळात आवश्यक असणारी बेड संख्या पूर्ण होत असल्याने राज्य शासनाकडे तयार असलेला प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. सदर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. अमित देशमुख यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. या पुढील काळात सदर प्रस्ताव राज्य शासनाकडून मंजूर करून आरोग्य विद्यापीठ नाशिक यांच्या परवानगीनंतर केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे परवानगीसाठी पाठविला जातो. या प्रस्तावाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग नवी दिल्ली यांची सुद्धा परवानगी आवश्यक असते. या संपूर्ण प्रक्रियेला वेळ लागणार असून गडचिरोली येथे पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर राज्य शासनाकडून निश्चित घोषीत केले जाणार असून शिवसेनेकडून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. अमित देशमुख, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेनी विरोधकांनी पसरविलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रद्द झाल्याचा गैरसमज चुकीचा असून लवकरच यावर्षी पालकमंत्र्यांकडून माध्यमांना याविषयीची माहिती दिली जाणार आहे. गडचिरोलीसह राज्यात काही ठिकाणी शासनाने सार्वजनिक खासगी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागतिले होते. काही शिक्षण संस्थांकडून अशा प्रकारे जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चालविण्यासाठी पुढाकार घेतला जाऊ शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात विकासाची गंगा आणणारे व जनतेच्या मुलभूत समस्यांविषयी तळमळ असणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलसोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निश्चितच प्रयत्नरत असून जिल्ह्यात विविध विकास योजना सुद्धा पूर्णत्वास आणण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रक्रिया पूर्ण करून विद्यार्थ्यांच्या आरोग्य शिक्षणाची व जनतेच्या आरोग्य सुविधांची समस्या दूर करण्यासाठी पालकमंत्र्यांकडे शिवसेनेच्या वतीने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती शिवसेना जिल्हा समन्वयक किरण पांडव यांनी दिली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button