जाहिरात
ब्रेकिंग न्युज

नैनपुर जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन ठार तर एक गंभीर जखमी.

आई व दोन मुलांचा जागीच मृत्यू, वडील गंभीर जखमी.

Spread the love

उमेश गोलेपल्लीवर

लोकशाही न्यूज प्रतिनिधी

नवेगावबांध:राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील देवरी ते नागपूर मार्गातील सडक-अर्जुनी तालुक्यातील नैनपुर गावाजवळ आज ता.५ ला ७ . ३० वाजता झालेल्या अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू तर वडील गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सदर सविस्तर वृत्त असे की, लाखांदूर तालुक्यातील धरतोडा येथून देवरीकडे आज सायंकाळी ६:३० वाजता गावाजवळ एका अज्ञात ट्रकच्या धडकेत दोन मुले, पत्नी जागीच ठार झाले. तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्या गंभीर जखमी ला नागपूर येथील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. त्यात चिन्मय तुळशीराम मेश्राम वय ६ वर्ष, प्रीती तुळशीराम मेश्राम वय 34 वर्ष तर एक मुलगा बारा वर्षाचा त्याचे नाव कळू शकले नाही. वडील तुळशीराम रामा मेश्राम वय 45 हे गंभीर जखमी आहेत. त्यांना नागपूर येथे रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. झालेल्या घटनेत अज्ञात वाहनाच्या धडकेत पाचशे मीटर अंतरावर त्या स्प्लेंडर गाडी क्रमांक एम.एच. 35 डब्ल्यू. 2351 ला फरकडत नेल्याची घटना आहे. तुळशीराम रामा मेश्राम हे देवरी तालुक्यातील देऊळगाव येथे शिक्षक म्हणून पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे. पुढील तपास डूग्गीपार पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button