मनुबाई-गुंजाळा ग्रामसेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध.
अध्यक्षपदी गजानन वायाळ तर उपाध्यक्ष पदी सुभास वायाळ यांची निवड
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
संदिप म्हस्के
मनुबाई गुंजाळा ग्रामसेवा सोसायटी ची १३ सदस्य संख्या असलेली सोसायटी मध्ये मनुबाई येथील – गजानन संतोषराव वायाळ ,सुनिल एकनाथ वायाळ ,सुभास दामोदर वायाळ,रामेश्वर वायाळ,रविंद्र सवडतकर, दिनकर वायाळ,दत्तू इंगळे, रुख्मिना वायाळ,शिवगंगा वायाळ असे ९ सदस्य तर गुंजाळा येथील दशरथ वायाळ, संदीप केदार ,राजु ईलग,सुधाकर खिल्लारे.असे ४ एकूण तेरा सदस्यांची निवडणूक गजानन वायाळ यांच्या नेतृत्वात बिनविरोध झाली होती.आज चिखली सहाय्यक निबंधक कार्यालयात निवडणूक अधिकारी गारोळे साहेब व सहाय्यक निवडणूक अधिकारी निकाळजे साहेब यांनी काम पाहिले यावेळी अध्यक्ष पदासाठी गजानन संतोषराव वायाळ यांचा एकमेव अर्ज व उपाध्यक्ष पदासाठी सुभाष दामोधर वायाळ यांचा अर्ज असे एक अर्ज आल्यामुळे अध्यक्ष पदी गजानन संतोषराव वायाळ त उपाध्यक्ष पदी सुभाष दामोधर वायाळ यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी सुनील केदार मनुबाई चे सरपंच मधुकर वायाळ ,सुनील इंगळे, नंदकिशोर वायाळ ,सागर पडघान पाटील,गजानन दिनकर वायाळ ,लक्ष्मण जाधव, दिनकर नाना वायाळ , प्रविण लहाने व मनुबाई व गुंजाळा या दोन्ही गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती.नवडी नंतर बाजार समितीचे मुख्य प्रशासक नंदुभाऊ सवडतकर व प्रशासक सतिश बाहेकर,बाळासाहेब पवार ,यांनी बाजार समितीच्या वतीने अध्यक्ष , उपाध्यक्षचा सत्कार केला.