जाहिरात
गडचिरोली

पुष्कर कुंभमेळा करीता जाण्यासाठी एसटी बसेसचे वेळापत्रक 

Spread the love

गडचिरोली ,दि.11: सिरोंचा येथील प्राणहिता नदीवर 12 वर्षानी पुष्कर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे बसेसची पुढीलप्रमाणे व्यवस्था उपलब्ध आहे. गडचिरोली आगारातून गडचिरोली ते असरअल्ली 2 बसेस असून बसस्थानकावरुन सुटण्याची वेळ ही सकाळी 10.00 व 11.00 वाजता असेल. तसेच गडचिरोली ते अहेरी करीता 09 बसेसचे नियोजन करण्यात आले असून बसस्थानकावरुन सुटण्याची वेळी ही पुढील प्रमाणे आहे. 7.00, 8.15, 8.45, 10.15, 11.45, 12.30, 13.30, 15.30, 17.00 तसेच अहेरी आगारतून अहेरी ते असरअल्ली करीता 05 बसेसचे नियोजन करण्यात आले असून बसस्थानकावरुन सुटण्याची वेळ ही पुढीलप्रमाणे आहे. 6.00, 7.00, 8.00, 15.00, 16.00 असे नियेाजन असेल असे विभाग नियंत्रक रा.प गडचिरोली यांनी कळविले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button