ट्रॅव्हल्स – कार च्या भीषण अपघातात ५ ठार १ जखमी,काम्पा फाट्यानजीक घटना

लोकशाही न्युज, चंद्रपूर/ नागभीड (दि,४ मे)
आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास नागपूर वरून गडचिरोली साठी निघालेल्या एरबी (ARB) ट्रॅव्हल्स व कारचा नंबर (MH -49-BR -2242) चंद्रपूर जिल्यातील नागभीड जवळ काम्पा या गावजवळ समोरासमोर अपघात झाल्याने ५ जण जागेवर ठार तर १ जण जखमी झाल्याची घटना घडली.
धडक इतकी जोरदार होती की कारचा समोरचा संपूर्ण भाग चेंदामेंदा झाला आहे,व मृतदेह काढण्यासाठी गॅस कटर चा वापर करून मृतदेह कार मधून बाहेर काढण्यात आले,जखमीं मुलीला नागपूर येथील दवाखान्यात भरती करण्यात आलेले आहे.
मृतकांची व जखमीची नावे अनुक्रमे,
१)रोहन विजय राऊत (वय ३० वर्ष),
२)अखिलेश विजय राऊत (वय २८ वर्ष),
३)गीता विजय राऊत (वय ४५ वर्ष) रा,चंदननगर नागपूर,
४)सुनीता रुपेश फेंडर (वय ४०) रा,इंदिरानगर ,नागपूर
५)प्रभा शेखर सोनवणे (वय ३६ वर्ष) रा,लाखनी जि, भंडारा
६)यामिनी रुपेश फेंडर (वय ९ वर्ष) जखमी असून तिला नागपूर इथे हलविण्यात आले आहे.
झालेल्या अपघाताचा पुढील तपास नागभीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
