क्रिकेटपटू मो.अझरुद्दीन व मराठी अभिनेत्री श्रुती मराठे गडचिरोलीत येणार
२० जानेवारी ला गडचिरोली प्रीमियर लीग (जीपीएल) स्पर्धेचे उद्घाटन

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१५ जानेवारी)
विजय वडेट्टीवार फॅन्स क्लबच्या वतीने येत्या २० जानेवारीपासून जिल्हा प्रेक्षगार स्टेडियमवर ‘गडचिरोली प्रीमियर लीग’ (जीपीएल) (लेदर बॉल) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जीपीएलचा हा ८ वा सीझन आहे.सुप्रसिद्ध क्रिकेटपटू मो.अझरुद्दीन व मराठी अभिनेत्री श्रुती मराठे यांच्या हस्ते स्पर्धेचे सकाळी ११ वाजता उद्घाटन (२० जानेवारी ) सोमवार ला होणार असून पहिला सामना रामनगर रॉयल्स विरुद्ध गडचिरोली लॉयन्स यांच्यात होणार आहे.दिवसभरात सकाळी ८ वाजता पहिला सामना व दुपारी १ वाजता दुसरा सामना होणार आहे. प्रत्येक सामना हा २० षटकांचा होणार आहे.
स्पर्धेच्या उद्घाटनाकरिता अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून खासदार नामदेव किरसान (गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्र), आमदार डॉ. मिलिंद नरोटे (गडचिरोली विधानसभा क्षेत्र), आमदार रामदास मसराम (आरमोरी विधानसभा क्षेत्र), आमदार सुधाकर अडबले (नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ), आमदार एडवोकेट अभिजीत वंजारी (नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ), पोलीस अधीक्षक निलोत्पल, क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे हजर राहणार आहेत.
अशी माहिती फॅन्स क्लबचे प्रमुख बंडू शनिवारे यांनी आज दुपारी जिल्हा प्रेक्षागार मैदान येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला विनोद मैद, अजय बर्लवार, राहुल निलमवार, मंगेश देशमुख, अनुराग कुडकावार, प्रसाद कवासे, आशिष वाळके हजर होते.

(छायाचित्रात – मैदान सज्ज करतांना कर्मचारी वर्ग)
या स्पर्धेत वडसा वंडर्स, रामनगर रॉयल्स, सनरायझर्स गडचिरोली, सुपर स्ट्रायकर्स, गडचिरोली लायन्स, डॉक्टर्स इलेव्हन आणि अक्षय वॉरियर्स या स्पर्धेत जिल्हाभरातून तब्बल ७ संघ सहभागी होणार आहेत. एकमेका विरुद्ध लीग पद्धतीने २१ सामने खेळणार आहेत. एलिमिनेटर, क्वालिफायर व अंतिम सामना पकडून २४ सामने होणार आहेत. स्पर्धेत उच्च स्तरावरील पंच राहणार असून स्पर्धा किमान १५ दिवस चालणार आहे.

(पत्रकार परिषदेत माहिती देताना वडेट्टीवार फॅन्स क्लबचे पदाधिकारी)
स्पर्धेतील विजेत्या संघाला व खेळाडूंना मिळणार लाखोंची बक्षीस
¶¶¶
गडचिरोली प्रीमियर लीग’ (जीपीएल) क्रिकेट स्पर्धेत प्रथम पारितोषिक रु. ५ लाख, द्वितीय पारितोषिक रु. ३ लाख आणि तिसरा १ लाख रु.आहे. आयोजकांनी १ लाख रुपयांची बक्षिसे जाहीर केली आहेत.
सोबतच वैयक्तिक उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट विकेटकीपर, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज अशी बक्षिसे पण असणार आहेत.
