धानोरा: जिल्हा रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्ते तथा धानोरा नगरपंचायतीचे उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती ललित बरछा यांच्या वाढदिवसानिमित्त धानोरा येथील कृषी भवन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल २७ जणांनी रक्तदान केले.
धानोराच्या नगराध्यक्ष पौर्णिमा सयाम, जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, सभापती कालिदास मोहुर्ले, सभापती माणिकशहा मडावी, सभापती सिमा कोटांगे, नगरसेवक अल्का मशाखेत्री, देवांगणी चौधरी, कल्याणी गुरनुले, यामीना पेंदाम, सुषमा भुरसे, नरेश चिमूरकर, प्रदिप बोगा, भूषण उंदिरवाडे, स्विकृत नगरसेवक मल्लीक बुधवाणी, डॉ. दिलीप बर्वे, अक्षय भिष्णूरकर, नयन फुलझले, निशांत देशमुख, प्रमोद सहारे, भूषण फरांडे आदी मित्र परिवार व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
रक्ताचा तुटवडा भासू नये आणि गरजेचे वेळेस गरजूना रक्त उपलब्ध व्हावा, यासाठी हा रक्तदानचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. कोरोनाच्या काळातील रक्ताचा तुटवडा पाहता, रक्तदानाचा उपक्रम महत्वाचा ठरतो. वाढदिवसाला उत्स्वी स्वरूप न देता रक्तदानसारख्या प्रवित्र कार्यामधून कार्यकर्त्यांनी उपाध्यक्ष ललिता बरछा यांना शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त आयोजित महारक्तदान शिबिरामध्ये २७ लोकांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. यात तरूणाईचा सहभाग लक्षणीय होता. संपूर्ण धानोरामध्ये या उपक्रमाची प्रशंसा करण्यात आली .
