जाहिरात
गडचिरोली

कुक्कुट पालन व भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न..

Spread the love

गडचिरोली जिल्हयातील शेतकरी पारंपारीक पिक पद्धतीचा वापर करीत असल्यामुळे आर्थिक दृष्टया मागासलेले असुन चांगल्या दर्जाचे जीवनमान जगु शकत नाही. त्यामुळे दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शेतीपुरक उद्योगासाठी वाव देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून व कृषी महाविद्यालय गडचिरोली यांचे संयुक्त विदयमाने दिनांक २९.०३.२०२२ रोजी एक दिवसीय कुक्कुट पालन व भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम पार पाडण्यात आले.
सदर कुक्कुट पालन प्रशिक्षणात पोलीस उपविभाग धानोरा, पेंढरी, गडचिरोली, कार्यक्षेत्रातील दुर्गम भागातील १५० शेतकन्यांनी आपला सहभाग नोंदवला. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षणादरम्यान कुक्कुट पक्षांची (पिल्लांची) जोपासणा कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आज रोजी प्रशिक्षणार्थ्याच्या निरोप समारंभ कार्यक्रमादरम्यान हजर असलेल्या १५० शेतकऱ्यांना कुक्कुट पक्षी पालनाकरीता उपयोगात येणारे साहीत्य तसेच खाद्य, उच्च प्रतीचे भाजीपाला बियाणे मोफत वाटप करण्यात आले. आजपर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक ४१३, नर्सिंग असिस्टंट १९४३, हॉस्पीटलटी २९६, ऑटोमोबाईल २५४, इलेक्ट्रीशिअन १४०, प्लंम्बींग २७, वेल्डींग ३३, जनरल ड्युटी असिस्टंट ३८, फील्ड ऑफीसर ११ तसेच व्हीएलई ४५ असे एकूण २४०० युवक / युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सदर कार्यक्रम मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांचे संकल्पनेतुन व मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. सोमय मुंडे सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. अनुज तारे सा. यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रम प्रसंगी मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख सा. प्रकल्प संचालक आत्मा श्री. संदीप कहाडे, मा. डॉ. प्रकाश कडु सहयोगी अधिष्ठाता, कृ.म. वि. सोनापुर, मा. डॉ. आनंद टिंगरे कार्यक्रम समन्वयक कृषी महाविद्यालय सोनापुर, गडचिरोली हे उपस्थित होते.
कुकुट पालन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हयातील धानोरा, पेंढरी, गडचिरोली येथील उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार व सर्व पोलीस अंमलदार तसेच कृषी विज्ञान केंद्र व आत्माचे सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button