अखेर “तो” भ्रष्ट वनरक्षक राजेश दुर्गे निलंबित
ग्रामसभेची अवहेलना करणे वनरक्षकाच्या आले अंगलट

लोकशाही न्यूज गडचिरोली (दि,११ ऑक्टोंबर)
संपादक:संदिप कांबळे
गडचिरोली मुख्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावरील आंबेशिवणी येथे ग्रामसभेची परवानगी न घेताच संयुक्त वनसमिती गठित करून गैरव्यवहार केला, ग्रामसभेच्या परवानगी शिवाय बँकेत अकाउंट सुद्धा काढले व बँकेतील अकाउंटचे चेक सुद्धा लोकांना देऊन परस्पर पैसे विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करताना या प्रकरणी उपवनसंरक्षक यांनी आज राजेश दुर्गे यांच्या निलंबनाचे आदेश पारित केले. सदर निलंबित अधिकारी राजेश दुर्गे याने कर्तव्यात कसूर केली असून अधिकाराचा दुरुपयोग केल्याचे सदर आदेशात नमूद केले आहे व तो आदेश आंदोलन कर्त्यांच्या सुपूर्द करण्यात आले.बाराव्या दिवशी आंदोलनाची समाप्ती वनरक्षक याच्या निलंबनाच्या कारवाईने झाली.

(राजेश दुर्गे यांना निलंबित केल्याचे उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांचे पत्र आंदोलकांना देतांना)
राजेश दुर्गे वनरक्षकावर कारवाई करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे व सहकारी आंदोलकांनी ५ ऑक्टोबरपासून मुख्यवनसंरक्षक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते.ठिय्या आंदोलन, ढोल बजाब आंदोलन ,अर्धनग्न आंदोलन,मुंडन आंदोलन असे अनोखे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. त्या आंदोलनाच्या आज बाराव्या दिवशी कारवाई झाल्याने आंदोलन कर्त्यांच्या आंदोलनाला यश आले असेच म्हणावे लागेल.
संयुक्त वन व्यवस्थापन समिती ही ग्रामपंचायतची उपसमिती असते. समिती स्थापन करताना ग्रामसभेची परवानगी अनिवार्य आहे. परंतु, वनरक्षकांनी पदाचा दुरुपयोग करीत स्वत:च्या मर्जीने कागदोपत्री संयुक्त वनव्यवस्थापन समिती तयार करून पैशाचा दुरुपयोग केला. दुरुपयोग झालेल्या पैशाची तात्काळ चौकशी करावी या मागणी करिता वनरक्षक कार्यालयासमोर बारा दिवस आंदोलन झाले.
मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात योगाजी कुडवे,नीलकंठ संदोकर, आकाश मट्टामी,धनंजय डोईजड, रवींद्र सेलोटे, चंद्रशेखर सिडाम,विलास भनारकर,विलास धानफोले,रवींद्र धानफोले, अमोल झंझाड, सुनील बावनवाडे, मोतीराम चांद्रगिरे,मुरली गोडसुलवार, तुळशीराम मेश्राम,रघुनाथ सिडाम,दिलीप झंझाड, ईश्वर तिवाडे आदी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता.
योगाजी कुडवे यांच्या आंदोलनाचा १९ वा बळी
¶¶¶
गडचिरोली जिल्ह्यात तसेच तालुक्यात सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध असलेले योगाजी कुडवे यांच्या आंदोलनाने आजपर्यंत अनेक कार्यालयातील जवळपास १९ अधिकारी व कर्मचारी निलंबित झालेले आहेत.राजेश दुर्गे हा वनरक्षक हा त्यांच्या आंदोलनाचा १९ वा बळी ठरलेला आहे.
