जाहिरात
आपला जिल्हाआरोग्य

२७ ला दिव्यांगाच्या दारी उपक्रम गडचिरोलीत, मान्यवरांची राहणार हजेरी

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (२६ सप्टेंबर)
संपादक:संदिप कांबळे

दिव्यांग कल्याण विभागातर्फे दिव्यांगाच्या दारी कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ व वितरण कार्यक्रम २७ सप्टेंबर रोजी होत आहे. यासाठी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत.

शहरातील आरमोरी रोडवरील संस्कृती सांस्कृतिक भवन येथे  १० वाजता होणार आहे.सदर कार्यक्रमाला मंत्री धर्मरावबाबा आत्राम,दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष तथा दिव्यांग अभियान चे मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, खासदार – अशोक नेते, आमदार डॉ. रामदास आंबटकर, अभिजीत वंजारी, सुधाकर  अडबाले, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे यांच्या उपस्थितीत दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा, जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी आदी उपस्थित राहणार आहेत.

दिव्यांगांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी स्टॉल लावले जाणार असून, सध्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.
यावेळी दिव्यांगांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार असू विविध योजनांचा लाभही देण्यात येणार आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button