जाहिरात
राजकीय

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वतंत्र लढविणार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष रवी वासेकर यांची माहिती

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.१७ ऑक्टोबर)

जिल्ह्याभरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची माहिती आज (दि.१७ ऑक्टोबर) रोजी कॉम्प्लेक्स येथील सर्किट हाऊस येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष रवी वासेकर यांनी दिलेली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी धर्मराव बाबा आत्राम यांनी निवडणूक लढविण्याची पूर्ण तयारी केली असताना देखील महायुतीमध्ये गडचिरोली- चिमूर हे लोकसभा क्षेत्र भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला गेल्याने महायुतीचा धर्म पाळत बाबांनी भाजप महायुतीची उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारामध्ये स्वतःला झोकून दिले होते. धर्मराव बाबा आत्राम यांची शस्त्रक्रिया झाली असताना सुद्धा बाबांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात तब्बल ६७ सभा घेतल्या होत्या.

विधानसभा निवडणुकीमध्ये अहेरी विधानसभा क्षेत्र हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला गेले. यावेळी मात्र भारतीय जनता पक्षाचे माजी राज्यमंत्री अंबरीशराव आत्राम यांनी बंडखोरी करीत धर्मराव बाबांच्या विरोधात निवडणूक लढविली. मात्र त्यानंतरही भाजपा पक्षश्रेष्टीनी राजे अंबरीशराव आत्राम यांच्यावर निलंबनाची वा पक्षातून बडतर्फी ची कारवाई सुद्धा केली नाही. याचा अर्थ भारतीय जनता पार्टीने अंबरीशराव आत्राम यांना निवडणुकीत पाठबळ दिले.

भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीत युती धर्म पाळला नाही. त्यामुळे आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वतंत्र निवडणुका लढविणार असल्याची माहिती दिली.

आज झालेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, लीलाधर भरडकर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, डॉ. रामकृष्ण मडावी माजी आमदार, डॉ. तामदेव दुधबळे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, विवेक बावनवाडे तालुका अध्यक्ष, अमोल कुळमेथे शहराध्यक्ष गडचिरोली, लौकिक भिवापुरे प्रदेश संघटक सचिव, चिनी मोटवानी जिल्हा उपाध्यक्ष, अमीन लालानी तालुका अध्यक्ष, किशोर तलमले, योगेश नांदगावे, सुनील नंदनवार, प्रदीप पाटीलवार, गिरीश खाडीलकर, सुषमा खेवले, बळवंत खेवले,किशोर बावणे यांचे सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते पत्रकार परिषदेला हजर होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button