जाहिरात
ब्रेकिंग न्युज

टाटा एस व दूचाकीच्या समोरासमोरील धडकेत ग्रामसेवक जागीच ठार.

Spread the love

उमेश गोलेपल्लीवार
तालुका प्रतिनिधी सावली

सिंदेवाही शहरापासून जवळच असलेल्या पाथरी रोड वरील शासकीय आयटीआयच्या जवळ झालेल्या अपघातात सरडपार येथील ग्रामसेवक रामकृष्ण इरपाते यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली .
सरडपार येथील ग्रामसेवक रामकृष्ण शामराव इरपाते वय 40 वर्ष रा. मेंडकी ता. ब्रह्मपुरी यांच्याकडे गुंजेवाही येथील ग्रामपंचायत ग्रामसेवकाचा प्रभार होता. ग्रामसेवक रामकृष्ण इरपाते हे गुंजेवाही वरुन युनिकॉन दुचाकी क्रमांक एम एच 34 ए डब्ल्यू 6453 या गाडीने येत असताना टाटा एस ऑटो क्रमांक एम एच 36 एफ 931 या गाडीला जोरदार समोरा समोर धडक झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताचे घटनेची माहिती मिळताच पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश घारे व त्यांचे चमू तात्काळ घटनास्थळी जाऊन भेट दिली व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदना करीता सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती येथील कर्मचारी व ग्रामसेवक दवाखान्यात गर्दी केले . सदर घटनेची पुढील चौकशी सिंदेवाही पोलीस स्टेशन करीत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button