जाहिरात
गडचिरोलीताज्या घडामोडी

वीज कर्मचाऱ्यांचा ७२ तासांचा संप सुरू, ३० संघटनेसह ३०० अधिकारी कर्मचारी संपात सहभागी

Spread the love

लोकशाही न्युज गडचिरोली (४ जानेवारी)

वीज वितरण कंपनी मर्यादित गडचिरोली विभागीय कार्यालयासमोर विद्युत कर्मचाऱ्यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून ७२ तासाच्या संपाला सुरुवात केली आहे,

महाराष्ट्र वीज वितरण कंपनी नष्ट करण्यासाठी या कंपनीला समांतर अशी अदानी इलेक्ट्रिक कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज आयोगाकडे समांतर परवानगीसाठी अर्ज केला आहे. सरकारने मंजुरी दिल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांचा नोकरीचा प्रश्न निर्माण होईल वीज वितरण कंपनी फायद्यात असताना ती तोट्यात जाऊन बंद पडू शकते असा आरोप वीज कर्मचाऱ्यांनी करीत ४ जानेवारीच्या मध्य रात्रीपासून संप पुकारलेला आहे .
४,५,६ जानेवारी २०२३ पासून ७२ तासांचा बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे .
अदानी कंपनीला कोणत्याही परिस्थितीत परवाना मिळू नये ही संप कऱ्यांची  प्रमुख मागणी आहे.

गडचिरोली येथील संपात पुरुषोत्तम वंजारी , रुद्रशेट्टी , कुंभरे, रामचंद्र ढोंगे , पिंपलकर, देशपांडे, सोनुले, वाशिमकर, बोंडे , कोहाड, बुरडकर, हेलवडे, बल्लामवार, राऊत, यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी संपात सहभागी आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button