जाहिरात
राजकीय

महाराष्ट्रात निघालेल्या ‘आप’ पार्टीच्या स्वराज्य यात्रेत गडचिरोली जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे यांचा सहभाग

स्वराज्य यात्रा लवकरच गडचिरोलीत

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,७ जून)

गुजरात निवडणूकीनंतर राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळालेल्या आम आदमी पार्टीने आता महाराष्ट्रात लक्ष केंद्रित केले असून पक्षाची भूमिका गावोगावी घेऊन जाण्यासाठी स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यात्रेची सुरुवात २८ मे रोजी पंढरपूर येथे विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाने होऊन ६ जून राज्याभिषेक दिनी रायगड येथे यात्रेची सांगता करण्यात आली.

त्यावेळी मंचावर राज्य अध्यक्ष रंगजी राचुरे,राज्य सचिव धनंजय शिंदे,राज्य संघटनमंत्री विजय कुंभार, प्रवक्ते मुकुंद किर्दीत ,डॉ देवेंद्र वानखेडे, संदिप देसाई,रायगड जिल्हाध्यक्ष मनोज घरत आदी उपस्थित होते, स्वराज्य यात्रा जिल्ह्यातून भ्रमण करण्यात आली पंढरपूर ते मुंबई, रायगड इत्यादी शहरात व गावांमध्ये रॅली काढून सभा घेण्यात आले. ७८२ किलोमीटरचा प्रवास ही यात्रा भ्रमण करीत ६ जून ला रायगडात पोहचली.

पक्षाचे राष्ट्रीय सह-सचिव व प्रदेश सह-प्रभारी युवा नेते गोपाल इटालिया ज्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला गुजरातमध्ये १३ टक्के मतदान मिळवत आप ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला, याच इटालिया यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्ह्यात यात्रा काढण्यात येणार आहे.

शासनाच्या दडपशाही विरोधात आवाज उठवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील सुराज्य आणण्यासाठी आम आदमी पार्टी वचनबद्ध आहे.मागील विधानसभा निवडणुकीनंतर विविध राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या पद्धतीने युत्या करत सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न केले. या सर्वच प्रस्थापित पक्षांची विश्वासार्हता संपली असल्यामुळेच महाराष्ट्रातील जनता नवीन पर्याय शोधते आहे आणि आम आदमी पार्टी आज काम की राजनीती करणारा नवा पर्याय म्हणून समोर येत आहे.

महाराष्ट्रातील सरकार व विरोधी पक्ष एकमेकांवरती टीका करताना जनतेच्या प्रश्नांकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले करीत आहे, शेतकरी, कष्टकरी, गृहिणी, युवक, सामान्य नागरिक अशा सर्वच वर्गाची झाली आहे. एकीकडे वाढती महागाई असताना शेतकऱ्यांचे, नोकरीचे प्रश्न तसेच शाळा, दवाखाना सामान्य जनतेचा म्हणजेच रयतेचा आवाज बनून आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरू पाहत आहे.

येणाऱ्या वर्षभरात स्थानिक तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार आहेत. आम आदमी पार्टी आता सर्वच निवडणुका लढवण्याची तयारी करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वेगळ्या गावांमधून पश्चिम महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावांमधून ही यात्रा काढली आहे.

यात्रे दरम्यान आम आदमी पार्टीचे शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील काम, दिल्ली मॉडेल चे यश आणि फायदे हे जनतेस सांगण्यात येत आहे. यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मजबूत संघटन बांधणीची तयारी आम आदमी पार्टी करीत आहे.

(स्वराज्य यात्रेत समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना बालकृष्ण सावसाकडे जिल्हा अध्यक्ष गडचिरोली)

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button