बस-दुचाकीच्या अपघातातील दुचाकीस्वाराला नागपूरला नेताना वाटेतच त्याने सोडले प्राण, नेरी सिरपूर मार्गावरील घटना
प्रतिनिधी- प्रवीण वाघे (दि,३ नोव्हेंबर)
चिमूर तालुक्यातील नेरी-सिरपूर मार्गावर बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास बस आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक होऊन दुर्दैवी अपघात झाला. यात दुचाकी चालक बसच्या आत आल्याने गंभीर जखमी झाला होता त्याला उपचाराकरिता चिमूर उपजिल्हा रुग्णालय नेले असता प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात आले असता नागपूर जवळ पोचताच रुग्णवाहिका मध्येच त्याने प्राण सोडला.


सदर दुचाकीस्वार लोहारा येथील अभिषेक प्रकाश सावसाकडे (२०) रा. लोहारा सिरपूर पहाडीच्या खाली दोन्ही वाहनात समोरासमोर जोरदार धडक झाली. यात बस च्या आतमध्ये अभिषेक घुसला त्याच्या पायाला दोन ठिकाणी फ्रॅक्चर होऊन मोडल्याने गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला तत्काळ रुग्णवाहिका पाचारण करून चिमूर येथील उपजिल्हारुग्णालय येथे नेण्यात आले होते परंतु खूपच चिंताजनक प्रकृती असल्यामुळे त्याला नागपूरला रुग्णवाहिकेने रवानगी करण्यात आली परंतु दुर्दैव असे की नागपूर जवळ वाटेतच त्याने आपला प्राण सोडला त्याचे पार्थिव परत आणून चिमूर येथील उपजिल्हारुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले त्याच्या जाण्याने त्याची आई पोरकी झाली असून वडील आधीच गेल्यामुळे एकटीच राहिली आहे या घटने लोहारा गावात शोककळा पसरली असून आज दुपारी त्याच्यावर आतिमसंस्कार करण्यात आले सदर घटनेचे पुढील तपास पोलीस करीत आहेत.
