गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राकरीता विशेष आर्थिक मदत जाहीर करा
खासदार डॉ. किरसान यांची संसदेत मागणी

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,३१ जुलै)
गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रात मागील आठवड्या भरापासून मुसळधार पाऊस चालू असून या अतिवृष्टी मुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊन संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे, बऱ्याच ठिकाणी रस्ते वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे, लोकांना आरोग्याच्या आणि इतर समस्यांना तोंड द्यावे लागत असून, घराची आणि शेतीची अतोनात नुकसान झाली आहे, ही सर्व जिल्ह्यातील विधारक परिस्थिती गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी दिल्ली येते सुरु असलेल्या अधिवेशनादरम्यान संसदेच्या सभागृहात मांडली व गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राच्या विकासाकरिता जिल्ह्याला विशेष आर्थिक मदत जाहीर करण्याची विनंती केली.
खासदार डॉ. किरसान यांचे भाषण चालू असताना हा विषय राज्य सरकारचा आहे, राज्य सरकाकडे मागणी करा असे म्हणत गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रातील समस्या मांडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न लोकसभा अध्यक्षांनी केला परंतु डॉ. किरसान यांनी त्या दबावाला न जुमानता जिल्ह्यात सतत होणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे सांगून निर्माण झालेल्या स्थितीशी अध्यक्षांना अवगत करुन व रुग्णाला खाटेच्या साहाय्याने १८ किलोमीटर खांध्यावर वाहून नेतांनाच्या घटनेचा तसेच एका गर्भवती महिलेला नाला ओलांडण्यासाठी जेसीबीच्या बकेटच्या साहाय्याने पलीकडे नेल्याच्या घटनांचा उल्लेख करुन गडचिरोली जिल्हा अनेक समस्यांनी ग्रस्त असल्याचे सांगून याजिल्ह्याच्या समस्या दूर करुन विकास करण्यासाठी केंद्राकडून जिल्ह्याला सरळ दरवर्षी १० हजार कोटीची तरतूद अर्थसंकल्पात कारण्यांत यावी व यासाठी एका डेव्हलोपमेंट बोर्डाची स्थापना करावी. ही बाब अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना अवगत करावी अशी विनंती लोकसभा अध्यक्ष याांना केली.
