जाहिरात
गडचिरोली पोलीसब्रेकिंग न्युज

६ लाख रू. ईनामी जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण,१ पुरुष व १ महिलेचा समावेश

पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती,

Spread the love

गडचिरोली (दि,२१ सप्टेंबर)

विलय दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाची यशस्वी कामगिरी ,शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्याचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. नुकतेच ६ लाख रुपये बक्षीस असलेले नक्षलवादी नामे अनिल ऊर्फ रामसाय जगदेव कुजूर, वय २६ वर्ष रा. तिम्मा जवेली ता. एटापल्ली जि. गडचिरोली व रोशनी ऊर्फ ईरपे नरंगो पल्लो वय ३० वर्ष रा. डांडीमरका पोस्टे आरेच्छा जि. नारायणपुर (छ.ग.) या दोन जहाल नक्षलवाद्यांनी मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांच्या समोर आत्मसमर्पण केले. पत्रकार परिषदेला समीर शेख व सोमय्या मुंडे हजर होते.
२०१९ ते २०२२ सालामध्ये आतापर्यंत एकुण ५१ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

 

आत्मसमर्पीत सदस्याबाबत माहीती

नामे अनिल ऊर्फ रामसाय जगदेव कुजूर
दलममधील कार्यकाळ 

१) माहे डिसेंबर २००९ ला कसनसूर दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे मे २०१० पर्यंत कार्यरत होता.
२) माहे मे २०१० ते २०१२ पर्यंत कसनसूर दलममध्ये कार्यरत होता तसेच सन २०१२ ते २०२२ या दरम्यान घरी राहूनच नक्षल दलमने सांगितलेले कामे करत होता.

कार्यकाळात केलेले गुन्हे
१) सन २०११ मध्ये मौजा खोब्राामेंढा अॅम्बुशमध्ये तो सहभागी होता. यावेळी सीआरपीएफ १९१ बटालियनचे १ जवान शहीद व ०५ जवान जखमी झाले होते.
२) सन २०११ मध्ये मौजा निहायकल ते ग्यारापत्ती रोडवरील अॅम्बुशमध्ये तो सहभागी होता. यावेळी सीआरपीएफ १९१ बटालियनचे ५ जवान जखमी झाले होते.
3) सन २०११ मध्ये मौजा छोटा झेलीया जंगल परिसरातील चकमकीमध्ये तो सहभागी होता

आत्मसमर्पीत होण्याची कारणे.

१) शासनाने राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांमुळे जनतेचा नक्षलवाद्यांना पाठिंबा मिळत नाही.
२) वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.
३) दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही वैवाहीक स्वतंत्र आयुष्य जगता येत नाही.
४) पोलीस दलाच्या सततच्या नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाले आहे.
५) वरिष्ठ कॅडरचे माओवादी सर्व जमा केलेला पैसा स्वत:च्या उन्नतीसाठी वापरतात व कनिष्ठ माओवाद्यांना गरजेपुरताही पैसा दिला जात नाही.
६) खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात.
७) नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून सुध्दा स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही.

 

नामे रोशनी ऊर्फ ईरपे नरंगो पल्लो
दलममधील कार्यकाळ

१) सन २००९ ला जटपूर दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन १ महीना कार्यरत होती.
२) सन २००९ ते २०१५ पर्यंत झोन टेक्नीकल दलममध्ये कार्यरत होती.
3) सन २०१५ ते सन २०१८ पर्यंत एसीएम व उपकमांडर पदावर कार्यरत राहून माहे जुलै 2२०१८ ते सन २०२२ पर्यंत घरी राहून दलमचे काम करत होती.

कार्यकाळात केलेले गुन्हे
१) सन २०१५ मध्ये मौजा कुंदला (छ.ग.) जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभागी होती.
2) सन -२०१५ मध्ये मौजा गुंडूरपारा (छ.ग.) जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभागी होती.
3) सन २०१७ मध्ये मौजा दुरवडा (छ.ग.) येथे गोटूलमध्ये झालेल्या व जंगल परिसरात झालेल्या एकुण दोन चकमकीमध्ये सहभागी होती.
4) सन २०१५ मध्ये भामरागड तालुक्यातील मौजा इरपनार गावातील ३ इसमाचा तीने खुन केलेला आहे.

आत्मसमर्पीत होण्याची कारणे.

१) नक्षलींना कोणत्याही कामासाठी पैसे दिले जात नाही.
२) नक्षल दलममध्ये वरिष्ठ माओवाद्यांकडून स्त्री आणि पुरूष यांच्यामध्ये भेदभाव केला जातो.
३) महीला नक्षलवाद्यांना वरच्या पदापर्यंत जाण्याची संधी मिळत नाही.
४) महीला नक्षलवाद्यांना फक्त अवजड कामे दिली जातात व त्यांना महत्वाच्या अभियानात सहभागी केले जात नाही.
५) वरिष्ठ माओवाद्याकडून महीला नक्षलींना लग्नासाठी बळजबरी केली जाते
६) पोलीस – नक्षल चकमकीदरम्यान महीला नक्षलींना समोर करून पुरूष नक्षलवादी हे पळून जातात.

महाराष्ट्र शासनाने जाहिर केलेले बक्षीस.

१) महाराष्ट्र शासनाने अनिल ऊर्फ रामसाय जगदेव कुजूर याचेवर ४ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
२) रोशनी ऊर्फ ईरपे नरंगो पल्लो हिचेवर २ लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस.
३) आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन अनिल ऊर्फ रामसाय जगदेव कुजूर यास एकुण ५ लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
४) आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रोशनी ऊर्फ ईरपे नरंगो पल्लो हीला एकुण ५ लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यावर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाने जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्वीकारावा असे आव्हान याप्रसंगी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले आहे .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button