विमा कंपनी व कृषी विभागाच्या आर्थिक संबंधमुळे शेतकऱ्यांचे नुकसान:- मनसे प्रदेश उपाध्यक्ष-बालाजी मुंडे
गंगाखेड प्रतिनिधी (दि,१५ सप्टेंबर)
गंगाखेड तालुक्यात एकूण पाच मिल आहेत जुलै महिन्यात प्रचंड अतिवृष्टी झाली पिकांच्या पूर आला पाणी लागले आहे अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत आज ऑगस्ट महिन्यात जवळपास तीन आठवडे पावसाने दडी मारली असून सोयाबीन कापूस तूर ज्वारी पीक करपली आहेत चला 17 ते 21 दिवस पावसाचा खंड पडला असा अहवाल तालुका तालुका प्रशासनाने दुष्काळजन्य परिस्थिती म्हणून तयार केला नाही विमा कंपनी व कृषी विभागाचे काही आर्थिक देवाण-घेवाण साटेलोटे झाले का ? असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी मुंडे यांनी केला आहे गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी राणीसावरगाव महातपुरी गंगाखेड महसूल मंडळांमध्ये 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई पासून वगळण्यात आली जुलै मधील अतिवृष्टी व ऑगस्ट मधील पावसाचा खंड हा वास्तव भावाला प्रत्येक गावातील शिवारात जाऊन तयार करावा व शेतकरी बांधवांना शासनाने अनुदान व पीक विमा मिळवून द्यावा अन्यथा मनसे लवकरच रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असे गंगाखेड तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर मनसे शेतकरी प्रदेश उपाध्यक्ष बालाजी मुंडे ,तालुका अध्यक्ष हनुमान डबडे, तालुका उपाध्यक्ष रामेश्वर सूर्यवंशी ,अंगद मुंडे, अंतरवेलीचे चेअरमन नाथराव मुंडे ,शेतकरी माधवांना मुंडे ,शेतकरी रामकिसन मुंडे, परमेश्वर मुंडे, सरपंच नवनाथ पाळवदे, संग्राम देवकते, मुंजाजी मुळे ,शीलवंत दबडे, लक्ष्मण कुडाळकर, माणिक मुंढे, हनुमान पवार, संतोष सूर्यवंशी,नवनाथ कटिंगआदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .