लोणार तालुका प्रतिनिधी
भारत पाडमुख.
मेरा बु , ता. चिखली (१५ मे) बुलडाणा जिल्हा न्यायालयात काम करणारे ऍड. बी.के. सानप आणि ऍड. रमेश भागीले यांच्या गाडीला रात्री 11 वाजेदरम्यान भीषण अपघात झाला. यात ऍड. सानप जागीच गतप्राण झालेत तर भागीले यांना गंभीर मार लागला आहे. अनियंत्रित झालेल्या सानप यांच्या इको स्पोर्ट कारने (एम. एच. २८ ए झेड १५३१) डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या लक्झरीला धडक दिली. त्यामुळे लक्झरी सुद्धा पलटली. लक्झरी बाजूच्या शेतात उलटल्याने जीवित हानी झाली नाही. परंतु चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झालेत. इकडे लकझरीवर आदळलेली कार चेंदा मेंदा झाली. सदर सुद्धा (एम.एच. बीए ६३००) पुण्याकडे जात होती. लक्झरीच्या ड्रायव्हरलाही मार लागला आहे. कार चालवित असलेल्या सानप वकिलांनी सिटवरच प्राण सोडलेले होते. तर बाजूला बसलेले भागीले कारमध्ये फसले. त्यांना क्रेन लावून आणि दरवाजा सब्बलने तोडून काढावे लागले. भागीले यांच्या शरीराचा डावा भाग फ्रॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर चिखली येथील जवंजाळ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. अपघाताची माहिती मिळताच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी चिखलिला पोहोचून भागीलेंची भेट घेतली. ऍड. जयसिंगराजे देशमुख, ऍड. सुमित सरदार, राणा सुरेंद्रसिंग ठाकूर, बंटी जाधव तथा इतर मित्रमंडळ हॉस्पिटलला उपस्थित होते. चिखली पोलिसांसह समाजिक कार्यकर्ते शुभम पडघान, अजय गवारगुरू तसेच मित्रमंडळाने भागिले यांना कारमधून बाहेर काढण्यात महत्वाची भूमिका निभावली.
सानप यांच्या मुलाच्या ऍडमिशननिमित्त ते आणि ऍड. भागीले सकाळपासून औरंगाबादला गेलेले होते. बुलडाणा परत येत असतांना बेराळा फाट्याजवळ हा अपघात घडला .