जाहिरात
गडचिरोलीताज्या घडामोडी

गडचिरोली शहरातील प्रतिष्टीत सुनील बट्टुवार दाम्पत्याचा अपघात,मुलगा कृष्णाचा जागीच मृत्यू

Spread the love

भिवापूर (दि,२२ ऑगष्ट)

गडचिरोली येथील प्रतिष्ठित इलेक्ट्रिक ठेकेदार तथा  मनमिळाऊ स्वभावाचे सुनील बट्टूवार यांचा आज पहाटे पहाटे चार वाजता भिवापूर जवळील नाल्याच्या पुलाला  धडक दिल्याने अपघात झाला. वाहन क्रमांक (MH ३३ A ६२९२) कार अपघातात सुनील बट्टूवार यांचा  मुलगा जागीच ठार झाला मुलगा कृष्णा(वय १४) स्कूल ऑफ स्कॉलर मध्ये इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत होता तर पत्नी व स्वतः गंभीर जखमी आहेत दोघांना नागपूर येथील रुग्णालयात आयसीयू मध्ये भरती करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार सुनील बट्टूवार यांची मुलगी अमेरिकेत शिक्षण घेत आहे ती अमेरिकेत शिक्षण घेण्याकरिता जात होती तिचे विमान रात्री अडीच वाजता असल्यामुळे बट्टूवार दांपत्याने तिला एअरपोर्टला अडीच वाजता सोडले व मुलाची सकाळची शाळा असल्यामुळे परत  गडचिरोली येण्याकरिता निघाले दरम्यान भिवापूर जवळ गाडी चालवत असताना गाडीचे नियंत्रण सुटले  जवळील नाल्याच्या पुलावर गाडी ने धडक दिली  धडकेत गाडी पुलाच्या खालती उतरून जोरदार पलटी खात रस्त्यावरून खाली उतरली व या अपघातात मुलगा कृष्णा सुनील बट्टूवार याचा जागेस मृत्यू झाला तर सुनील बट्टूवार यांच्या छातीला व मानेला जोरदार  दुखापत झाल्यामुळे त्यांना नागपूर येथील रुग्णालय हलवण्यात आलेले आहे तसेच पत्नीला मानेवर जोरदार मार बसल्याचे सूत्रांकडून कळले आहे सदर घटनेची माहिती गडचिरोलीत पसरतात सर्वीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे नेमका अपघात कशामुळे झाला याचे कारण सध्या पुढे येऊ शकले नाही मुलगा कृष्णाच्या पार्थिव शरीराला उद्या अग्नी देण्यात येईलअशी माहिती कुटुंबीयांकडून मिळालेली आहे मुलगी ही अमेरिकेला जात असताना माहिती मिळताच गोव्यावरून परत निघाली असल्याची माहिती यावेळेस देण्यात आलेली . झालेल्या अपघाताने बट्टू वार कुटुंबीयांवर दुःखाची शोककळा पसरली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button