जाहिरात
आपला जिल्हाक्राईम

३३ लाख रुपये किंमतीचा सुगंधीत तंबाखु जप्त

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,११ सप्टेंबर)
संपादक:संदिप कांबळे

देसाईगंज पोलिसांना मिळाल्याने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ३३ लाख रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात यश आले,सोबत दोन आरोपी पकळण्यात यश सुद्धा आले.

पोलीस निरीक्षक रासकर पोलीस स्टेशन देसाईगंज यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार राऊत, ढोके सराटे,कुमोटी असे सापळा रचुन, १) आशिष अशोक मुळे, वय ३० वर्ष, रा. खरबी, पोस्टे खेड, ता. ब्राम्हपुरी, जि. चंद्रपुर
२) अतुल देविदास सिंधीमेश्राम, वय २९ वर्ष, रा. भवानी वार्ड ता. ब्राम्हपुरी, जि. चंद्रपुर यास पकडले व त्याचे ताब्यातुन
१) लाल रंगाची टाटा कंपनीची आयशर वाहन क्र. एमएच ४० सिएम ६५५२ कि. अंदाजे. १० हजार रुपये
२) २४ नग मोठ्या पांढ­या रंगाचे प्लॅस्टीकच्या चुंगळीमध्ये प्रत्येकी ६ नग पांढ­या रंगाचे कट्टे व त्या प्रत्येक कट्यामध्ये ११ नग पॅकेट व त्यावर ईगल हुक्का शिशा तंबाखु असे लिहिलेल्या प्रत्येक पॉकेटची किंमत ६४० रुपये असे एकुण १०, १३,७६० रुपये
३) २१ नग मोठ्या हिरव्या रंगाचे प्लॅस्टीकच्या चुंगळीमध्ये प्रत्येकी ४ नग पांढ­या रंगाचे कट्टे व प्रत्येक कट्टयामध्ये ४४ नग पॉकेट व त्यावर ईगल हुक्का शिशा तंबाखु असे लिहिलेल्या प्रत्येक पॉकेटची किंमत ३,१०० रुपये असे एकुण ११, ४५,७६० रुपये
४) १४ नग लहान पांढ­या रंगाचे प्लॅस्टीकच्या चुंगळीमध्ये प्रत्येक कठ्यामध्ये ४४ नग पॉकेट व त्यावर ईगल हुक्का शिशा तंबाखु असे लिहीलेल्या प्रत्येक पॉकेटची किंमत ३१० रुपये असे एकुण १,९०,९६०- रुपये असा एकुण ३३, ५०, ४८० रुपये (तेहतीस लाख पन्नास हजार चारशे अंशी रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करन्यात आला.

सदर कार्यवाहीपोलीस अधीक्षक नीलोत्पल,अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख ,उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांचे मार्गदर्शनात पोस्टे देसाईगंज येथील पोलीस निरीक्षक किरण रासकर यांचे नेतृत्वाखाली ज्ञानेश्वर धनगर,दिनेश राऊत, नरेश कुमोटी, विलेश ढोके व संतोष सराटे यांनी पार पाडली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button