४ नोव्हेंबर ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाविद्यालय बंद आंदोलन करणार
अभाविपच्या प्रदेशमंत्री पायल किन्नाके यांची पत्रकार परिषदेतून माहिती
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १४ ऑक्टोबर)
“प्रवेश, परीक्षा, परिणाम, पदभरती, पाठ्यक्रम- अशा महत्वाच्या अनेक विषयांवर योग्य व वेळेत कार्य करण्यास विद्यापीठ प्रशासला अपयश!”
गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठाच्या कामकाजातील ढिसाळपणा, निष्क्रियता आणि विद्यार्थ्यांच्या विषयांवर विद्यापीठ प्रशासनाने गंभीरतेने लक्ष न देता विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्याचे काम विद्यापीठ प्रशासन करत आहे. या निष्काळजी वृत्तीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य अंधारात जात आहे.अश्या विविध समस्यांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सातत्याने आवाज उठवत आली आहे. विद्यार्थी हितासाठी विविध निवेदन देण्यापासून पासून तर आंदोलन करण्यापर्यंत सर्व पातळ्यांवर परिषदेने प्रयत्न केले, तरीही विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा एकही ठोस निर्णय घेतलेला नाही.
परिणामी ४ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर, गडचिरोली, ब्रह्मपुरी, अहेरी येथील महाविद्यालय बंद आंदोलन व ११ नोव्हेंबर रोजी विद्यापीठ केंद्रावर तीव्र आंदोलन करीत असल्याची माहिती (दि. १२ नोव्हेंबर) ला प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रदेश मंत्री पायल किन्नाके यांनी दिली आहे.
पत्रकार परिषदेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या प्रदेश मंत्री पायल किनाके, विद्यापीठ मोर्चा प्रमुख सुजान चौधरी, गडचिरोली जिल्हा संयोजक विकास बोदलकर, गडचिरोली नगर मंत्री संकेत मस्के, विकास कोल्हटकर हजर होते.
