आरमोरी : दुर्गा माता देवस्थान मधील अनियमिततेची चौकशी करा
शरद बोरकर यांची पत्रकार परिषदेत मागणी

लोकशाही न्युज,गडचिरोली ( दि. १५ मार्च )
आरमोरी दुर्गा माता देवस्थान पुरातण देवस्थान आहे. येथील नवरात्रात दुर्गा उत्सव विदर्भात प्रसिद्ध आहे . दरवर्षी लाखो भाविक या दुर्गामातेचे दर्शनासाठी येत असतात. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानच्या मंडळामध्ये घटनेनुसार कारभार सुरू नसल्याने बरीच अनियमितता असल्यामुळे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आयोजित गडचिरोली प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दुर्गा माता देवस्थान ट्रस्टचे सदस्य शरद बोरकर,रेवतीराम मने, जितेंद्र मने, भाविक अमित जोशी, राकेश घाटे यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना बोरकर म्हणाले की, दुर्गा माता देवस्थानात वर्ष २०१५ ते आजतागायत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले कारभार स्वमर्जीने व मनमानी पद्धतीने केल्या जात आहे. मंडळाच्या सर्व सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेण्यात येतात. आम्ही दुर्गा माता देवस्थान मंडळाची चौकशी करण्याची मागणी सहाय्यक धर्मादाय आयुक्त गडचिरोली यांच्या कडे केली आहे. घटनेतील नियमानुसार प्रत्येक सभेची नोटीस सभेच्या पुर्वी तिन दिवस किंवा त्याअगोदर देणे अपेक्षीत आहे.
परंतु तसे न करता येथिल पदाधिकारी कधीही सभा बोलावितात. त्याची माहितीही मंडळाच्या सदस्यांना होत नाही. त्यामुळे मंडळाच्या निर्णयामध्ये बाकी सदस्यांना आपले मत मांडता येत नाही. नविन सदस्यांची नियुक्ती सभेत बहुमताने निवडून आले असले तरी नियमानुसार ते मंडळाचे सदस्य नाहीत मनमानीने देवस्थान चे सचिव श्री गणेश वनवे हे प्रत्येक सभांना बोलावून संख्येच्या बळावर सर्वानुमते ठराव पारीत करतात हे नियम बाहय आहे. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे मृत्युनंतर नाव बदल प्रक्रीया सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांचेकडे सादर केला आहे. यावरील कारवाई सहाय्यक धर्मादाय आयुक्त गडचिरोली या कार्यालयात प्रलंबित आहे. सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय गडचिरोली यांचे कडे अंकेक्षण सादर केलेला आहे. सन २०१५ ते २०२३ पर्यन्तच्या कालावधीत केलेल्या ऑडीटमध्ये अनियमितता दिसुन येते. मंदिर जिर्णोद्वाराच्या बांधकामांचे हिशोब बरोबर ठेवला नाही. घटनेतील निर्देशानुसार मंडळाचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष यांचे संयुक्त खाते असतांनाही संबंधीतांनी अद्यापपर्यन्त आदान-प्रदान व्यवहार केलेला दिसुन येत नाही. मंदिर बांधकाम व दरवर्ष्याचा नवरात्र उत्सव, व दान पेटीतील महिण्याला जमा होणारी रक्कम बँकेत जमा केली जात नाही. तसेच देवस्थानच्या नावाने गाळे व शेती असून सदर गाळे किरायाने दिलेले आहेत त्याच्या पासुन मिळणाऱ्या किरायाचा हिशोब ठेवल्या जात नाही. सन २०१० पासुन किरायेदाराला पावती दिली गेली नाही. रक्कम बँकेत जमा केली जात नाही त्यामुळे एकंदर देवस्थानच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मनमानी कारभार चालवुन अनियमितता केली असल्याने त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आयोजित पत्रकार परिषदेत दुर्गा माता देवस्थान ट्रस्टचे सदस्य शरद बोरकर,रेतीराम मने, दुर्गा मातेचे भाविक जितेंद्र मने, अमित जोशी, राकेश घाटे यांनी केली आहे.
राकेश घाटे म्हणाले की, मी या देवस्थानच्या मंडळाचे सर्वसाधारण सदस्य होतो व माझे वडील रमेश घाटे हे देवस्थान चे कोषाध्यक्ष होते. माझ्या वडिलाच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी सदस्य म्हणून माझी नियुक्ती न करता व मला कोणतीही पुर्व सुचना न देता माझे सर्वसाधारण सभासदत्व सुद्धा काढून टाकले. व माझ्या ठिकाणी आपल्या नातेवाईकांना सभासदत्व दिले. याबाबत आपण सहाय्यक धर्मादाय आयुक्त गडचिरोली यांच्या कडे दाद मागितली आहे.
तुळशिराम गोंधोडे, अध्यक्ष
दुर्गा माता देवस्थान ट्रस्ट आरमोरी
!!!
मी दुर्गा माता देवस्थान आरमोरी या देवस्थान मंडळाच्या अध्यक्षपदी डिसेंबर २०२३ पासुन जबाबदारी स्वीकारली आहे. तत्कालीन अध्यक्षांच्या परवानगीने व आदेशानुसार आम्ही सर्व सदस्यांनी व पदाधिकार्यांनी दुर्गा माता देवस्थान मंडळाचे कामे केली. त्यात नवरात्रात दुर्गा उत्सव साजरा करणे, देवस्थानच्या जिर्णोद्धार चे बांधकाम व मंदिराची डागडुजी करणे, व इतर सर्व कामे तत्कालीन अध्यक्षांच्या परवानगीने कामे केली गेली आहेत . तत्कालीन अध्यक्षांनी मंदिर जिर्णोद्वाराच्या बांधकामांचे हिशोबाचे आडिट केला आहे.आता मी अध्यक्ष म्हणून देवस्थान चे कामे नियमानुसार करीत आहे. शरद बोरकर , रेतीराम मने जितेंद्र मने यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत. यांना सभेला बोलाविले तरी सभेला उपस्थित राहत नाही.
गणेश वणवे, सचिव
दुर्गा माता देवस्थान ट्रस्ट आरमोरी
!!!!
श्री बोरकर व मने यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत. कोणत्याही मंडळाच्या किंवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड सभासदांमधुन बहुमताने होत असते. आमच्या देवस्थानचे पदाधिकारी व सदस्यांची निवड सर्वानुमते झालेली आहे. माझी सचिव पदी निवड झाल्यापासून मी अध्यक्षांच्या परवानगीने व आदेशानुसार देवस्थानचे कामे घटनेनुसार करीत आहे. डिसेंबर २०२३ पासुन सचिव पदाची सुत्रे हाती घेतले तेंव्हा पासून देवस्थान मंडळाचा कारभार अध्यक्षांच्या आदेशानुसार व घटनेनुसार सुरळीत सुरू आहे. पंचक्रोशीतील प्रसिद्ध असलेल्या देवस्थानची बदनामी करण्याचा प्रयत्न शरद बोरकर , रेतीराम मने, जितेंद्र मने यांच्या कडून केला जात आहे.
