जाहिरात
आपला जिल्हा

तलावातील अवैध उत्खननाची चौकशी करा अॅड. कविता मोहरकर यांची तक्रार

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.१३ मार्च)

तालुक्यातील नवरगाव तलावातून होणाऱ्या अवैध मुरूम व रेती उत्खननाची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष अॅड. कविता मोहरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. चौकशी संदर्भात तहसीलदार यांचेकडे तक्रार सुद्धा दाखल केली आहे.पत्रकार परिषदेला अपर्णा खेवले यांचेसह महिला पदाधिकारी हजर होते.

पोर्ला ते नवरगाव ५ कि. मी. रस्त्याचे बांधकाम ‘प्रधानमंत्री सड़क योजने’ अंतर्गत सुरू आहे. जिल्हयातील अनेक रेतीघाट बंद असतानाही संबंधीत ठेकेदाराने अवैध रेती उपसा करून दोन पुलाचे बांधकाम केलेले आहे, एक पोर्ला वनतलावाच्या खाली तसेच दुसरे नवरगाव – कोंढाणा रोडवर अवैध व बेकायदेशीर कामे करून शासनाची फसवणुक केलेली आहे.

सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button