जाहिरात
क्राईम

पुतण्याने केली काकाला मारहाण, न्यायासाठी मुलाची पत्रकार परिषद

Spread the love

लोकशाही न्युज गडचिरोली (दि २७ जून)

गडचिरोली मुख्यालयापासून २५ किलोमीटर दूर असलेल्या करमटोला गावातील २५ जून रोजी ही घटना असून,
मोरेश्वर बारीकराव वलादे वय ३० ( ग्यरापत्ती आश्रम शाळा कंत्राटी शिक्षक) व त्यांची पत्नी यांचा झगडा सुरू असताना मोरेश्वर बारीकराव वलादे यांनी माझे वडील शिवदास टिकाराम वलादे राहणार करमटोला यांना बेदम मारहाण करून जखमी केले.

माझ्या वडिलाला जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले असून डोक्यावर जबर जखम होऊन तीन टाके पडलेले आहेत व शरीरावर दुर्मिळ जखमा आहेत तरी माझ्या वडिलाला मारहाण करणाऱ्या मोरेश्वर बारीकराव वलादे याला तात्काळ अटक करून मला न्याय देण्यात यावा अशी मागणी पिडीताचा मुलगा गुलाब शिवदास वलादे (वय २२) यांनी  स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत  केलेली आहे.
सदर तक्रार पोलीस स्टेशनला घेतलेली असून तपास सुरू आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button