जाहिरात
आपला जिल्हानिधन वार्ता

पोलीस शिपायाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली(दि.१३ फेब्रुवारी)

गडचिरोली विशेष कृती दल / SAG येथे कार्यरत असणारे पोशी / ३८११ मृतक शिपाई रवीश राजू मधुमटके वय ३४ वर्षे रा. गोकुलनगर वार्ड क्र.२३ जि. गडचिरोली यांचा काल संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

कियार ते आलापल्ली रस्त्यावरील रोड ओपनिंग अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी ते आपल्या पथकासोबत रवाना झाले होते. यादरम्यान पोलीस स्टेशन कोठीपासून ५ किलोमीटर चालल्यानंतर, त्यांनी अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली असता त्यांना तात्काळ भामरागड येथील ग्रामीण आरोग्य केंद्र/आरएचसी येथे हलवण्यात आले होते, मात्र तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले होते.

त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे प्राथमिक मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. आज रोजी त्यांचा अंत्यविधी गडचिरोली येथिल कठाणी नदी घाटावर होणार आहे.त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी,आई, वडील, ३ वर्षीय मुलगी आहे.त्याचे वडील नगर परिषद गडचिरोली येथे कार्यरत आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button