“लाडकी बहीण” योजनेकडे सरकारचे दुर्लक्ष
जानेवारी महिन्याचा हप्ता अजुनही खात्यात जमा नाही

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.३० जानेवारी)
मुख्यमंत्री माझी “लाडकी बहीण” योजनेचा हप्ता जानेवारी महिना संपत आला तरी खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा न झाल्याने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यांनी महाराष्ट्र राज्य शासन वर नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ५३ हजार १६४ लाभार्थी आहेत या सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बॅंक खात्यावर जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला की नाही याची खातरजमा करण्याकरिता अनेक लाडक्या बहिणी बँकेमध्ये हेलपाटे मारताना चे चित्र दिसत आहे.
तरी महाराष्ट्र शासनाने या गंभीर विषयाची दखल घेऊन लाडक्या बहिणीच्या खात्यात तात्काळ त्यांचा हप्ता जमा करावा अशी मागणी गडचिरोली जिल्ह्यातील अनेक लाडक्या बहिणीनी या माध्यमातून केली आहे. महाराष्ट्र शासनाने ही योजना तर बंद केली नाही ना अशी महिलांमध्ये कुजबूज सुरू आहे.
