२१ जानेवारी ला गोंडवाना विद्यापीठाचा १३ वा दीक्षांत समारंभ

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. १९ जानेवारी)
गोंडवाना विद्यापीठाचा तेरावा दीक्षांत समारंभ बुधवार, दि. २१ जानेवारी, २०२६ रोजी सकाळी, ११.३० वाजता गोंडवाना विद्यापीठाचे नविन सांस्कृतिक सभागृह येथे संपन्न होणार आहे. या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान कुलगुरु, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली डॉ. प्रशान्त बोकारे, हे भूषवणार असून प्रमुख प्राहुणे म्हणून संस्थापक, सर्च (SEARCH), चातगाव , गडचिरोली डॉ. अभय बंग हे दीक्षांत भाषण करणार आहेत . तसेच या समारंभात गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु, डॉ. श्रीराम कावळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
सदर समारंभामध्ये, अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद यांचे सन्माननिय सदस्य,दानदाते आणि विद्यापीठातील विविध प्राधिकरणाचे, मंडळाचे, समित्यांचे सदस्य यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या समारंभात विशेष गुणवत्ता प्राप्त, प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी व विद्यार्थीनींना सुवर्ण पदक, आचार्य पदवी व पदवी, पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सदर कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी केले आहे .
आचार्य पदवीचे विद्याशाखा निहाय विद्यार्थी
!!!
मानव विज्ञान विद्याशाखा ४३, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा ३४, वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा १५ ,आंतरविद्याशाखिय विद्याशाखा ४ असे एकूण ९६ विद्यार्थ्यांना आचार्य पदवी वितरित करण्यात येणार आहे.
सर्वाधिक सुवर्णपदक मिळविणाऱ्या विद्यार्थिनी
वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेतून सर्वाधिक सुवर्णपदके मिळवणारी विद्यार्थिनी नेवाजाबाई हितकरीणी महाविद्यालय, ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूरची वैष्णवी संजय थेरकर हिला तीन, आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतून राष्ट्रपिता महात्मा गांधी आर्ट अँड विज्ञान कॉलेज, नागभीड चंद्रपूरची जादा रबिया रियाज हिला तीन अशी सर्वाधिक सुवर्णपदके मिळवली आहेत.
विद्याशाखानिहाय सुवर्ण पदके
!!!
मानव विज्ञान विद्याशाखा २३ ,विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा ८ , वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा ५ आंतर विद्याशाखा ३ या दीक्षांत समारंभात एकूण ३९ विद्यार्थ्यांना सुवर्ण , एक रजत अशी एकूण ४० पदके प्रदान केली जाणार आहेत. तसेच स्पार्क(SPARC)अभ्यासक्रमाच्या (Social Programme on Addiction in Rural Community ) विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात येणार आहे .
